आमचे उमेदवार निवडून आल्यास पोटासाठी नाहीतर लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी झटतील – पुरूषोत्तम खेडेकर

| सोलापूर | निवडणूकीत संभाजी ब्रिगेडचे उमेदवार निवडून आल्यास ते पोटासाठी नाहीतर संविधानाला अभिप्रेत लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी झटतील असे स्पष्ट मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले. विधानसभेत संभाजी ब्रिगेडचे दोन- तीन जरी आमदार असते तर मराठा आरक्षण पदरात पाडून घेतले असते असेही यावेळी खेडेकर म्हणाले.

ते संभाजी बिग्रेडच्या पुणे पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारार्थ सोलापूर येथे बोलत होते.
विजापूर रोड वरील मयूर बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पुढे बोलताना ॲड.पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, संभाजी बिग्रेडने महाराष्ट्रातील जनतेसमोर एक सक्षम राजकीय पर्याय ठेवला आहे. संभाजी ब्रिगेडची सत्ता आल्यानंतर सर्व प्रथम महाराष्ट्रात १०० टक्के दारूबंदी करून मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ महिलांचे केले जाईल असे आश्वासन खेडेकरांनी देवून संभाजी बिग्रेड पोटापाण्यासाठी राजकारणात आली नसून संविधानाला अपेक्षित लोककल्याणकारी लोकराज्य व जनतेचे राज्य निर्माण करण्यासाठी राजकारणात सक्रिय झाल्याचे सांगितले.

मनोज कुमार गायकवाड हे होतकरू युवक असल्याने आपण सर्वांनी १ नंबर पसंतीचे मत देवून संभाजी बिग्रेडचा एक उमेदवार सभागृहात पाठवावा असे आवाहन ॲड.खेडेकर यांनी शेवटी केले.

याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार मनोजकुमार गायकवाड, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अर्जून तनपूरे, प्रा. अशोक काजळे, छत्रपती मूस्लिम ब्रिगेड जिल्हाध्यक्ष फारुकभाई शेख, शहराध्यक्ष मतीन बागवान, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा  उज्वला साळुंखे, शहराध्यक्षा संजीवनी मूळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, पंढरपुर विधाग अध्यक्ष सचिन जगताप,  मराठा सेवा संघ माढा तालुका दिनेश जगदाळे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष अंबादास रेडे, कर्निक नगर गृह निर्माणचे प्रा. अशोक काजळे, जिजाऊ ब्रिगेडच्या निर्मला शेळवणे, विर भगतसिंग विदयार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष परशुराम पवार, दैनिक कटुसत्यचे  संपादक पांडुरंग सुरवसे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष प्रा.जिवन यादव, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष सदाशिव पवार, प्रा. संजय जाधव, प्रा. लक्ष्मण महाडीक, सखाराम साठे, कल्याण गव्हाणे व गोवर्धन गुंड आदी उपस्थित होते.

तर प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळवून देऊ !

संभाजी ब्रिगेडचा उमेदवार विधानपरिषदेत गेला तर तो शिक्षक आमदारकीच्या निवडणूकीसाठी प्राथमिक शिक्षकांना मतदार म्हणून हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन त्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागली तरी करू कारण राज्यात त्यांची संख्या जास्त आहे व समस्याही इतरांपेक्षा जास्त आहेत.त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. शासकीय नोकऱ्यांबरोबरच रोजगार निर्मिती कडे तरूणांना वळविण्यासाठी विविध आर्थिक योजना प्राधान्याने सुरू करण्यात येतील असे ॲड पुरूषोत्तम खेडेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *