दिशा अंबुरे हिचे एसएससी परीक्षेत नेत्रदीपक सुयश..!

| पोलादपूर | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ नवी मुंबई वाशी यांचे मार्फत मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर झाला असून या परीक्षेत विद्या मंदिर पोलादपूर प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी दिशा चंद्रकांत अंबूरे हिने ९१.४० टक्के गुण प्राप्त करून नेत्रदीपक सुयश संपादन केले आहे.

दिशा अंबुरे ही माऊली प्रशाला कोतवाल शाळेतील माध्यमिक शिक्षक चंद्रकांत अंबुरे यांची कन्या असून तिने मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अंबुरे सर यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिशा हिला शुभेच्छा दिल्या आहेत.

दिशा हिचे या यशाबद्दल पोलादपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे विद्यामंदीर पोलादपूर मुख्याध्यापक केगारे, शाळा समिती चेअरमन निवासभाई शेठ, मळेगाव संस्थेचे सहसचिव हेमंत(बापू)गडसिंग व पदाधिकारी यांनी तिचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *