वैद्यकीय प्रवेशात ‘एक महाराष्ट्र, एक मेरिट’ पद्धत लागू ; जुना ७०-३० कोटा रद्द,

| मुंबई | वैद्यकीय प्रवेशात ७०-३० कोटा आज रद्द करण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. २०१५ पासून हा कोटा रद्द करण्याची मागणी होत होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली आहे. ७०-३० कोटा पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहतात, त्यामुळे राज्य सरकारने ही पद्धत रद्द केल्याचं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

राज्यात एक महाराष्ट्र, एक मेरिट पद्धत लागू करत असल्याची घोषणा देखील अमित देशमुख यांनी केली आहे. या कोटा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचं तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार सतिश चव्हाण म्हटलं होतं. हा कोटा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेण्यात आला. मराठवाड्यात ६ तर विदर्भात ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. ७०-३० कोटामुळे मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसत होता. असं स्थानिक आमदारांचं म्हणणं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published.