विराट – अनुष्का यांच्याकडून गुड न्यूज..!

| मुंबई | अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून नवीन वर्षात कोहली कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. क्रिकेटर विराट कोहलीने फेसबुकवर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज दिली. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

अनुष्कानेही तोच फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अनुष्काच्या प्रेग्नन्सीवरून बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांत ऐकायला मिळत होत्या. विरुष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनुष्का गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अनुष्काने वारंवार त्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र लॉकडाउनदरम्यान या सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी जोडीने घरात चिमुकला पाहुणा येणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली.

विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. २०१८ मध्ये ‘झिरो’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानं अनुष्काला अनेकांनी तिच्या ‘गुड न्यूज’बाबात प्रश्न विचारलं होतं. मात्र अनुष्कानं या चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगत गर्भवती असल्याची बातमी फेटाळून लावली होती. “मी सध्या माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. मला अन्य कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नाही. काही वर्ष मी करिअरवर लक्ष केंद्रीत करणार आहे,” असं ती त्यावेळी म्हणाली होती.

दरम्यान दोघांच्याही पोस्ट वर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.