श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूसगाव आणि निंबवी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!

| श्रीगोंदा | सध्या महविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे तातडीने पूर्ण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक कामे मार्गी लावण्यासाठी श्रीगोंदे तालुक्यातील मुंगूसगाव येथील उपसरपंच अनिल कानगुडे तसेच निंबवीचे सामाजिक कार्यकर्ते चिंटा मेजर आणि शंकर टकले यांचा श्रीगोंदा नगर विधानसभेचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

उपसरपंच अनिल कानगुडे यांनी सांगितले की आमदार जगताप हेच उद्याच्या तालुक्याचे भविष्य असून त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. तसेच गावातील सार्वजनिक कामे आणि विसापूर तळ्यावरील गावांसाठी पाण्याचा प्रश्न आमदार जगताप हेच मार्गी लावू शकतात. येथून पुढचे राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली करणार असल्याचे सांगितले.

यावेळी कुकडीचे माजी संचालक विष्णुपंत जठार, चेअरमन बाळासाहेब शिंदे, सचिन जठार, परशराम धुमाळ, प्रमोद इथापे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.