” शेवटी बेडकीन फुगून फुगून फुटते” ; ठाण्यात सध्या गाजतय हे पत्र..!

| ठाणे | मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नुकताच जामीन मिळाला असून ते पोलीस कोठडीतून बाहेर आले आहेत. दरम्यान त्यांच्यावर तडीपारीची नोटीस मात्र कायम आहे. विशेष म्हणजे या सगळया प्रकारामागे पालकमंत्री असल्याचे मनसेकडून बोलले जात आहे. त्यावरून मनसेने पालकमंत्री यांच्यावर टीका देखील केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने देखील आपली ताकद दाखवली आणि मनसे कार्यकर्त्यांचे पालकमंत्र्यांना नाहक बदनाम करण्याचे मनसुबे उघडे पडले. पालकमंत्री दिवस रात्र धडाक्यात काम करत असल्याने तशीच मनसे बॅकूटवर गेलेली दिसत आहे. त्यात शिवसेने सोबत सामान्य नागरिकांकडून देखील शिवसेनेची , पालकमंत्र्यांची जोरदार स्तुती केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील सुजाण, सुशिक्षित, सुसंस्कृत सामान्य ठाणेकराने लिहलेले हे पत्र प्रचंड व्हायरल होत आहे.

काय आहे त्यात : 

अनेक आंदोलने पाहिली, निषेधार्थ मोर्चे पाहिले, विरोध दर्शविताना बरेच नेते मंडळी पाहिली… पण हे मनसेचे सो कॉल्ड नेत्यांनी तर कहरच केला. वसई – विरार महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनात पोहोचून त्यांच्यावर अर्वाच्य भाषेत वाद घातला, त्यांना आई बहिनीवरून शिवीगाळ केली. एक सनदी अधिकारी म्हणजे आय.ए.एस. अधिकारी कोण असतो, त्यांची पत काय असते, त्यांचे अधिकार आणि हुद्दा काय, त्यांचे शिक्षण किती, इथवर पोहूचण्यासाठी त्यांनी किती परिश्रम घेतले आहेत याची यांना काय कल्पना येणार म्हणा. अर्थात त्याकरिता शिक्षण आणि संस्कारांची जोड असावी लागते, महाराष्ट्राची अस्मिता मानणाऱ्यांकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीची अशी पायमल्ली करणे कितपत योग्य आहे????

मुळात आपले शिक्षण किती, कोणाशी कसे वर्तन करावे याची जाण विसरून असे अश्लाघ्य वर्तन करणाऱ्या यांच्यावर वसई – विरार महापालिकेने गुन्हा दाखल केला त्यात चूक काय??? म्हणजे यांनी जनतेला न्याय देण्याचा दिखावा करून त्या नावाखाली एका सनदी अधिकाऱ्यासोबत अशा प्रकारची लांछनास्पद वर्तणूक करणे कितपत योग्य आहे हा प्रश्न आता उपस्थित होतो. बर, वसई – विरार महापालिकेने गुन्हा दाखल करून त्यामुळे साधी नोटीस आल्यावर हे असे वागत आहेत जणू काही हे स्वातंत्र्यसैनिकच, आणि पालघर जिल्ह्यात येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेबद्दल हे ठाणे व गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे षडयंत्र असल्याचा डंका पिटवत आरोप करतायत.

अहो, या सगळ्यांशी अनभिज्ञ आपण मुळात स्वतः जनतेच्या आशीर्वादाने साधे नगरसेवक होऊ शकला नाही आमदारकी तर फारच दूरची गोष्ट राहिली. ज्यांना मतदारसंघातील जनता जनार्दनाने आशीर्वाद देऊन ४ – ५ वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून पाठवले, ते तुमच्यासारख्या साधे नगरसेवक न झालेल्या व्यक्तीबाबत साधा विचार तरी का करतील??? ज्यांचा स्वभाव, ज्यांचे आचार आणि विचार, ज्यांची दानत संपूर्ण महाराष्ट्राची जनता जाणते आणि तुम्ही स्वतःच्या प्रसिद्धीकरिता त्यांच्यावर चिखलफेक करण्याचा भाबडा खटाटोप करताय. जरा इतिहास पहा, ज्या मंडळींनी याच्या अगोदर असे चाळे केले आहेत, त्यांना जनतेने निवडणुकीत त्यांची अर्हता दाखवून दिली आहे. त्यामुळे पणतीने सूर्यावर थुकण्याने सूर्य ताऱ्याला काहीही फरक पडत नाही, पण पणती मात्र विझते हे लक्षात घ्या.

महापालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणाची जहागीर नाही, आणि त्याचा गाडा हाकणारी प्रशासकीय यंत्रणा आणि तिचे नेतृत्व करणारे सनदी अधिकारी कोणाचे गुलाम नाहीत, की त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणीही सोम्या गोम्या उठेल आणि आई बहिणीवरून शिव्या घालेल. महाराष्ट्र म्हणजे युपी बिहार नव्हे, इथे कायदा सर्वांना समान आहे. त्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टीतील बेडकीण होऊ नका, कारण ती फुगून फुगून शेवटी फुटते हे विसरू नका…

– सुसंस्कृत ठाणेकर

2 Comments

  1. राजकारण सोडा
    पण अधिकारी काय काम करतात ते तरी सांगा
    शिक्षण तर सगळेच करतात पण लुटणारे अधिकारी कसे काय मग येतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *