PM केअर फंडात पाकिस्तानातून देणगी..?

| नवी दिल्ली | काँग्रेसने पुन्हा एकदा पीएम केअर्स फंडवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. बुधवारी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय दूतावासाकडून आलेल्या देणगीदारांच्या पावतीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन या प्रश्नांची यादी मांडली आहे.

रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर परदेशी देणग्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, चीन, पाकिस्तान आणि कतारवरुन पीएम केअर्स फंडात परदेशी देणग्या आल्या आहेत. या अनेक प्रश्न मला पडले आहेत. जवळपास १० प्रश्नांची यादी रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून भाजपा आणि केंद्र सरकारला विचारले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.