माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई..

| ठाणे | ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. तसेच अनधिकृत पार्किंगवर देखील कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.

या कारवाईतंर्गत माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील माजिवडा उड्डाणपुलाखालील अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असून शेजारील मुख्य रस्त्यावरील पोस्टर व बॅनर काढण्यात आले. बाळकूम गाव येथील तळ मजला व्याप्त असलेल्या दोन मजल्याचे कॉलम तोडण्यात आले. वाघबीळ गाव येथील स्टील्ट अधिक पाच मजली अनधिकृत इमारतीवरील पाचव्या मजल्याचे सेन्ट्रीगचे स्टील गॅस कटरने कट करण्यात आले असून दोन मजल्याचे मालदा साफ करण्याचे काम सुरू आहे. तसेच कोळीवाडा, कासारवडवली येथील स्टील्ट अधिक पाच मजली इमारतीतील मालदा उचलण्याचे काम सुरू आहे.

सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रामदास शिंदे, उथळसर प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *