घडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन

  • दिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन 

| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | आपल्या आजूबाजूला निसर्गात अनेक गोष्टी घडत असतात याकडे विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे ती घडण्यामागची कारणे शोधली पाहिजे अशीच का घडली याचा शोध घेतला पाहिजे व त्या मागील विज्ञान समजून घेतल्यास विज्ञान विषयाची भीती दूर होऊन नाविन्यपूर्ण संशोधन होऊ शकते यासाठी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बघितले पाहिजे असे प्रतिपादन उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटर भुसावळ चे अध्यक्ष जीवन महाजन यांनी केले

                      उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटर, भुसावळ रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन गुजरात एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट व एपीजे अब्दुल कलाम विपनेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव झोपे होते यावेळी सचिव बीटी इंगळे उषा फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप जावळे ग. स. सोसायटीचे संचालक योगेश इंगळे भुसावळ प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक प्रदीप सोनवणे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या संघटनेचे कार्याध्यक्ष समाधान जाधव एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चे व्हाईस चेअरमन सुनील वानखेडे मुख्याध्यापक एस एस अहिरे आदि उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उषा शंकर पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. श्री चंद्रमौली जोशी सर यांनी दिवंगत उषाबाई शंकर पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत मार्गदर्शन केले आणि नेहरू विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना गणित पेटी भेट देऊन सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यानंतर गणित व विज्ञान विषयावरील कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत जीवन महाजन यांनी हवा व हवेची वैशिष्ट्ये या विषयावर विविध प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट केल्या तसेच काही प्रयोग विद्यार्थ्यांकडून करून त्यांनी दररोज आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची कारण मीमांसा करण्याचे आवाहन केले.

  • गणिताशी मैत्री करा – सुनील वानखेडे

                           इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विविध स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाच्या माध्यमातून उच्चस्तरीय शिक्षणासाठी असलेल्या परीक्षांमध्ये यश हमखास मिळते यासाठी प्रश्नांची उकल करताना विद्यार्थ्यांनी कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न अचूक सोडवले पाहिजे यासाठी पारंपारिक गणित सोडवण्याच्या पद्धती सोबतच कमी वेळेत अचूक उत्तर सोडवण्याच्या ट्रिक्स समजावून घेतल्या पाहिजे यामुळे वेळेची बचत होऊन स्पर्धा परीक्षेत यश हमखास मिळते यासाठी विद्यार्थ्यांनी गणिताची मैत्री केली पाहिजे असे मार्गदर्शन करत तसेच याबाबतचे प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखवत एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चे व्हाईस चेअरमन सुनील वानखेडे यांनी करून घेतली.

विद्यार्थी झाले प्रयोगात मग्न

                            रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन कडून उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरला विविध प्रयोगाचे साहित्य देण्यात आलेले आहे या साहित्याची मांडणी सकाळच्या सत्रात करण्यात आली या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या साहित्य स्वतः हाताळत त्या मागील वैज्ञानिक कारण विद्यार्थ्यांनी समजून घेतले स्वतः कृती करावयाची असल्याने विद्यार्थी प्रयोगात मग्न झाले होते या ठिकाणी 200 पेक्षा जास्त विविध प्रयोग व माहितीचे पोस्टर्स लावण्यात आले होते.

                            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .एस.एस. सरोदे यांनी तर आभार श्री .एल.एस.पाटील यांनी मानले तर आयोजक संस्था आणि शाळेच्या सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.