एमपीएससी मध्ये प्रसाद चौगुले राज्यात पहिला

| मुंबई | राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९ निकाल लागला लागला आहे. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे.

ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये ४२० अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. १३-१५ जुलै २०१९ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.

प्रसाद हा सातारा जिल्यातला असून तो सर्वसाधारण वर्गातून पहिला आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातला रवींद्र शेळके हा मागासवर्गियांमधून पहिला आला आहे. तर महिलांमधून अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटील ही पहिली आली आहे. आयोगाच्या वेबसाईटवर पूर्ण निकाल देण्यात आला आहे.

मुख्य परीक्षेसाठी राज्यातून ६८२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून १ हजार ३२६ मुलं मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहेत. आता त्यातल्या ४२० जणांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी निकालानंतर १० दिवसांच्या आत ऑनलाईन फॉर्म भरावा असं आवाहन आयोगाने केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *