सायबर सेल कडून व्हॉटस्अॅप साठी विशेष मार्गदर्शिका जारी..!


  • महाराष्ट्र सायबर सेलने सोशल मीडियासाठी विशेष मार्गदर्शिक जारी केला आहे.
  • सर्व सोशल मीडिया विशेषत: व्हॉटस्अॅपवरील सर्व ग्रुप, त्यांचे निर्माते, अ‍ॅडमिन आणि सदस्यांनी याचं पालन करण्याचं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

मुंबई : कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर सध्या चुकीचे मेसेज शेअर होत आहेत. विशेषत: व्हाट्सअ‍ॅपवर अफवा पसरवणारे चुकीचे मेसेज, फोटो, व्हिडीओ, पोस्ट पाठवल्या जात आहेत. या पार्श्वभीमीवर महाराष्ट्र सायबर सेलने सोशल मीडियासाठी विशेष मार्गदर्शिक जारी केला आहे. सर्व सोशल मीडिया विशेषत: व्हॉटस्अॅपवरील सर्व ग्रुप, त्यांचे निर्माते, अ‍ॅडमिन आणि सदस्यांनी याचं पालन करण्याचं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. गृहमंत्र्यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. कोरोनाला धार्मिक रंग देत समाजात अशांतता पसरेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात असल्याचंही अनिल देशमुख सांगितलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप सदस्यांसाठी मार्गदर्शिका

१.  चुकीच्या/खोट्या बातम्या, द्वेष निर्माण करु शकणारी भाषणे आणि अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करु नये.


२.  आपल्या ग्रुपमधील अन्य कोणी सदस्याने अशी माहिती ग्रुपवर पाठवली तर आपण पुढे कुणालाही पाठवू नये.

३. आपण ग्रुपवर कोणतीही पोस्ट टाकल्यास आणि त्यावर ग्रुप अॅडमिन/अन्य सदस्यांनी आक्षेप घेतल्यास तात्काळ संबंधित पोस्ट ग्रुपवरुन आणि आपल्या मोबाईल फोनमधूनही डिलीट करावी.

४. तुम्हाला मिळणाऱ्या बातमीचा स्रोत आणि त्याची सत्यता पडताळूनच ती बातमी आवश्यक वाटल्यासच फॉरवर्ड करावी.

५. ग्रुपवर शेअर होणाऱ्या पोस्ट्सचे नियमितपणे परीक्षण करा.

६. परिस्थितीनुसार गरज पडल्यास ग्रुप सेटिंग बदलून only admin अशी करावी, जेणेकरुन अनावश्यक मेसेज ग्रुपवर टाळता येतील.

७. जर काही सदस्य सूचना देऊनसुद्धा आक्षेपार्ह पोस्ट्स टाकत असतील तर त्यांची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *