शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्याची परवानगी द्या
राज्य खुला कर्मचारी महासंघाचे मुख्यमंत्र्याना पत्र..!| औरंगाबाद | राज्याच्या विविध जिल्हा परिषदांमध्ये स्वजिल्ह्यापासून शेकडो किलोमीटर दूर हजारो शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. अशा शिक्षकांना लॉकडाऊन काळात स्वजिल्ह्यात परतण्याची परवानगी देण्याची महत्वाची मागणी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यातील विविध जिल्हा परिषदांतील प्राथमिक शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांनी स्व जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने जाण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रस्ताव सादर केलेले आहेत; परंतु त्यांना आंतरजिल्हा बदली मिळालेले नाही. अशा शिक्षकांची संख्या दहा ते पंधरा हजारांच्या घरात आहेत. राज्यातील एकूण कार्यरत शिक्षकांमध्ये या शिक्षकांची संख्या केवळ १० टक्क्यांच्या आसपास आहे. हे शिक्षक दिवाळी व उन्हाळी सुट्यांमध्येच कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. मात्र यावर्षी कोरोना मुळे ते कार्यरत जिल्ह्यामध्ये अडकून पडले आहेत. दरवर्षी दुसरे शैक्षणिक सत्र १ मे रोजी संपत असते. दुसरा लॉकडाऊन संपेपर्यंत जिल्हा परिषदेचे शिक्षक आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या सर्व जबाबदारी पार पाडत आहेत.

तरी या शिक्षकांना जिल्ह्यात परतण्याची परवानगी व तशी वाहतूक व्यवस्था मिळाल्यास दिलासा मिळेल अशी अपेक्षा खुला प्रवर्ग महासंघाचे पदाधिकारी सनिदेवल जाधव, गोविंद सोळंके पाटील, साहेबराव कल्याण, संतोष जगताप व राजेंद्र गोडसे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


2 Comments

  1. हीच वेळ आहे परजिल्ह्यात नोकरी करत असलेल्या शिक्षकाच्या मागे ठाम उभे राहण्याची ल त्यांना त्यांच्या परिवारासोबत भेट घडवून द्यायची

  2. हो स्व जिल्ह्यात अशा शिक्षकांना काम द्यावे, शहरातील गर्दी कमी करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *