
| कल्याण | ठाकरे सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला असताना या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद अखेर रद्द झाले आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने यासंदर्भात सादर केलेल्या अहवालावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे.
केडीएमसीतील २७ गावांमधील १८ गावे राज्य सरकारकडून वगळण्यात आली आहेत. यात घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांचा समावेश आहे.
तर, आजदे, सागाव, नांदीवली पंचानंद, घारीवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडा ही गावे केडीएमसीत ठेवली आहेत. केडीएमसीतील नगरसेवकांचे सदस्यत्व ११ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे.
दरम्यान २७ गावातील १८ गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने या गावातील नगरसेवकांचे पद रद्द करा असा अहवाल महापालिकेच्या निवडणूक विभागाने सूर्यवंशी यांना पाठविला होता. त्याला आयुक्तांनी मान्यता दिल्याने मुदत संपण्यापूर्वीच तेथील नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. त्यामुळे मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, सोनी अहीरे, उर्मिला गोसावी, कुणाल पाटील, प्रमिला पाटील, प्रभाकर जाधव, दमयंती वझे जालिंदर पाटील, इंदिरा तरे, विमल भोईर, शैलजा भोईर, सुनिता खंडागळे या १३ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.नगरसेवकपद रद्द करण्याच्या कार्यवाहीवर संबंधित नगरसेवक काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री