सर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाची गणित दिलासादायक करणारा अर्थतज्ञ लोकप्रतिनिधी..

सध्यस्थितीत सर्वसामान्यांचेच काय तर सर्वांचेच घरखर्चाचे बजेट प्रचंड महागाईमुळे कोसळले असल्याचे दिसत आहेत. महागाईचा भस्मासूर आ वासून उभा आहे, त्यावर शिवसेनेच्या माध्यमातून आणि केंद्रातील सत्ताधारी सोडून इतर सर्व पक्ष आंदोलने – निषेध याविविध मार्गाने आवाज उठवताना दिसत आहेत.

डिझेल – पेट्रोल – गॅस या सर्वांचे भाव गगनाला भिडल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या सर्व उत्पादनांचे भाव वाढले आहेत. या महागाईमुळे सर्वांची कंबर तुटली आहे. केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून हातावर हात धरून बसण्यापेक्षा, त्यांच्यावर विसंबून राहण्या ऐवजी आपल्याला काही मार्ग काढता येईल का या विचाराने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जवळपास ५ वर्षापूर्वी घरातील गॅस जोडणी (कनेक्शन) या योजनेवर भर देवून त्याचा पाठपुरावा सुरू केला. कारण या योजनेमुळे प्रत्येक गृहिणींचा गॅस खर्च निम्म्याहून ही जास्त कमी होणार होता (उदा. सिलेंडरचे ने – आण व बाटला भरण्याचा, हमाली व गॅस ऐजन्सी कमिशन हा सर्व खर्च वाचणार आहे) यासाठी महानगर गॅस व ही जोडणी करते वेळी लागणाऱ्या ना हरकत परवांनग्यासाठी संबंधित सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका लावल्या आणि कामास गती आणली.

साधारणतः ३ वर्षापूर्वी डोंबिवली निवासी येथे पहिली घरगुती गॅस लाईन जोडणीचा श्रीगणेशा सुरू केला. कल्याण लोकसभा मतदार संघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, कळवा, मुंब्रा येथील पहिल्या टप्प्यात जवळपास आतापर्यंत २ लाख जोडणी पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढील दुसऱ्या टप्प्याच्या काळात २ लाख जोडण्या पूर्ण करण्याचा मानस आहे. ज्या विविध मार्गाने घराचे बजेट सावरता येईल ते सर्व प्रयत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करताना दिसत आहेत. उदा. विविध रोगांवरील आरोग्य शिबिरे, मोफत ऑपारेशन्स, मोफत चष्मावाटप, सरकारी हॉस्पिटल येथे कमीत कमी खर्चात अत्याधुनिक उपाय मिळावे म्हणून आधुनिक मशिन्स उपलब्ध करून देणे.

हातावर हात धरून बसण्यापेक्षा मार्ग शोधणारे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे आज सर्व थरातून कौतुक होत आहे.. या महागाई आणि कोरोना काळातील कंबरतोड परिस्थितीवर रामबाण गणित मांडणारा अर्थतज्ञ या कल्याण लोकसभा मतदार संघास लाभला हे भाग्य समजून येथील नागरिक त्यांचे आभार व्यक्त करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.