समृद्ध ग्राहक अनुभवाला प्रोत्साहन देण्यासाठी गोदरेज इंटेरिओची डिजीटल सेवांना चालना…!

ठळक मुद्दे :

✓ गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै २१ अखेरीपर्यंत ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून ४३% ची विलक्षण वाढ; आर्थिक वर्ष २२ च्या अखेरीपर्यंत ऑनलाईन विक्रीत ४०% वाढीचे उद्दिष्ट

✓ ऑनलाईन विक्रीतून पश्चिम विभागातील बाजारपेठेतून २९.०६% महसुलाची निर्मिती..

| मुंबई | गोदरेज अँड बॉयस या गोदरेज समूहातील प्रमुख कंपनीने आज असे जाहीर केले, की घरगुती आणि संस्थात्मक फर्निचरच्या क्षेत्रात भारतातील आघाडीचा फर्निचर ब्रँड असलेल्या गोदरेज इंटेरियो या आपल्या व्यवसायाद्वारे असे दिसून आले आहे, की भारतात कोविड-१९ आपत्तीचा उद्रेक झाल्यापासून घरगुती साठवणुकीचे (होम स्टोअरेज) फर्निचर ही ऑनलाईन विक्री मध्यमातून सर्वाधिक विक्री होणारी श्रेणी बनलेली आहे. कंपनीने अशीही घोषणा केली, की आपल्या इंटेरीयर विभागाची डायरेक्ट टू कस्टमर (डी२सी) व्यासपीठाच्यामार्फत आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत ४० टक्के वृद्धी होण्याचे उद्दिष्ट आहे, आणि पुढील दोन वर्षांत ३० टक्के वृद्धी होण्याची चिन्हे आहेत.

फर्निचर रिटेल उद्योगक्षेत्रातील जागतिक प्रवाहांशी सुसंगत राहताना गोदरेज इंटेरियो प्रमुख डिजिटल तंत्रज्ञानाचा, ऑटोमेशन आणि प्रक्रियांचा अंगीकार करण्यासाठी भरपूर मोठी गुंतवणूक करत आहे. देशभरात सर्वाधिक संख्येने अस्तित्व निर्माण असलेला एक कणखर, सक्षम, खऱ्या अर्थाने सर्वंकष आणि सर्वव्यापी फर्निचर ब्रड म्हणून स्थान निर्माण करण्यासाठी ही डिजिटल तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि प्रक्रियांमधील गुंतवणूक उपयोगी ठरणार आहे.

आपल्या बॅकएंडला गोदरेज इंटेरियोने ‘रोबस्ट प्रोसेस ऑटोमेशन’ सादर केलेले आहे. ही ऑटोमेटेड प्रक्रिया वापरून कंपनीतील अंतर्गत संवादाला वेगवान बनविण्यात येत आहे कारण सध्या बहुसंख्य टीम मेंबर्स घरूनच काम करत आहेत (वर्क फ्रॉम होम). आपल्या सर्व भागधारकांशी सतत जोडलेले राहण्याच्या खर्चात बचत करता यावी तसेच पुरवठा साखळीच्या खर्चात कपात करता यावी या दृष्टीने देखील कंपनीने तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरवात केलेली आहे. त्या खेरीज फ्रंटएंडचा विचार करायचा झाला तर, कंपनीने नाविन्यपूर्ण डिजिटल टूल्स सादर केले आहेत. आपल्या ग्राहकांना स्वतःच्या राहत्या जागेसाठी सर्वोत्तम, सुयोग्य असे उत्पादन सहजतेने शोधण्यात मदत व्हावी यासाठी ‘व्हिज्युअल सर्च टूल’सारख्या सुविधांचा त्यामध्ये समावेश आहे. गोदरेज इंटेरियोने आर्टीफिशीयल इंटेलिजन्स (एआय) चा देखील अवलंब करण्यास सुरवात केलेली असून त्याद्वारे डिझाईन्स, मटेरियल्स, जिओमेट्रिक्स सारे काही स्कॅन करणे आणि त्यायोगे लोकांकडे असलेल्या घराच्या आकार आणि आराखड्यानुसार उत्पादने सुचवणे साध्य केले जात आहे. वेबसाईटच्या माध्यमातून कंपनीच्या स्टोअरची जणू प्रत्यक्ष भेट दिल्यासारखी चालत ३६० अंशांत पाहणी करण्याची सुविधा ग्राहकांना प्रत्येक उत्पादनावर झूम करून ते नीट निरखून, पारखून पाहण्याची तसेच स्टोअरमधील प्रतिनिधीशी संवाद साधण्याची मुभा देणारे आहे. या सर्वांच्या जोडीला कंपनीने थ्रीडी कॉन्फीग्युरेटर सुविधा देखील सादर केली आहे, ज्या अंतर्गत ग्राहक कंपनीच्या विक्रेत्या टीमच्या सोबतीने आपल्याला हवी तशी उत्पादने निवडून ती उत्पादने घेतल्यास आणि वापरल्यास आपली खोली नेमकी कशी दिसू शकेल हे खरेदी निश्चित करण्याआधीच पाहू शकणार आहे.

गोदरेज इंटेरियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष (बी२सी) सुबोध मेहता म्हणाले, “या आपत्तीच्या कालखंडाने अखंडित समन्वित तंत्रज्ञानाचा अंगीकार करून ग्राहकांसाठी ऑनलाईन खरेदीची अनुभूती अधिक सुधारित, अधिक समृध्द करण्यासाठी ब्रँडला भाग पाडले आहे. ग्राहकांच्या वर्तणुकीतील बदल लक्षात घेऊन गोदरेज इंटेरियोमध्ये आम्ही आमच्या डिजिटल आणि रिटेल स्टोअरचा सुरेख समन्वय साधला असून ऑनलाईन माध्यमाद्वारे आमचे कामकाज अधिक वाढवून ग्राहकांना एक परिपूर्ण आणि सर्वसमावेशक, सर्वव्यापी अनुभूती देण्यास सुरवात केलेली आहे. आमच्या रिटेल दालनांनी किंचितशी वेगळी वाट धरली असून अधिक डिजिटल टूल्सचा अंगीकार केलेला आहे. त्यामुळे विक्रीच्या टप्प्यावर आमच्या ग्राहकांचा अंतिम निर्णय घेण्यापर्यंतचा प्रवास आता अधिक सोपा, सुकर झालेला आहे. आम्ही डिलिव्हरी व्यवस्था आणखी सक्षम आणि विस्तृत करतानाच २००० पिनकोडवरून ती संख्या ५००० पिनकोडपर्यंत नेत आहोत. आमच्याकडे इंटेरियर डिझायनर्स आहेत, जे ग्राहकांना त्यांची फर्निचर खरेदी झाल्यानंतर घराचा, खोलीचा लूक कसा दिसेल याची झलक दाखवण्यात सहाय्य करत आहेत, तसेच त्यांना पुढे जाऊन डिझाईनविषयक सल्लामसलत देखील पुरवत आहेत. आमच्या वापरण्यास सुलभ असलेल्या, ई-कॉमर्सचे भक्कम पाठबळ लाभलेल्या वेबसाईटद्वारे ग्राहकांना आमच्या उत्पादनांचा शोध घेण्याची आणि खरेदी करण्याची एक जबरदस्त उत्तम संधी ऑनलाईन प्राप्त झालेली आहे.”

आपल्या सर्व वितरकांना (डीलर्स) ई-कॉमर्स पोर्टलवर एकत्रित आणण्याची गोदरेज इंटेरियोची योजना असून त्यायोगे ग्राहक थेट आपली मागणी नोंदवू शकतील आणि देशाच्या कोणत्याही भागात कंपनीच्या वितरकामार्फत ग्राहकाला त्याचा पुरवठा केला जाईल. आगामी काळात ‘कन्झ्युमर इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (सी-आयओटी) ही सुविधा सादर करण्याची देखील कंपनीची योजना आहे. याच महिन्याच्या प्रारंभी गोदरेज इंटेरियोला ‘ट्रस्ट रिसर्च अॅडव्हायजरी’द्वारे ‘फर्निचर रिटेल’ श्रेणीमधील २०२१ सालचा “भारतातील सर्वाधिक हवाहवासा वाटणारा ब्रँड” (इंडियाज मोस्ट डिझायरेबल ब्रँड २०२१) हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या ब्रँडने एका वर्षात लक्षणीय झेप घेत २०२० वर्षीच्या १८६ व्या स्थानावरून यंदा थेट ३८ वे स्थान पटकावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.