आता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..!

| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात ग्राहकांना आपल्या बॅंकेची शाखा बदलण्यासाठी वारंवार बॅंकेत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. स्टेट बॅंकेने बॅंकेची शाखा बदलण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन केली आहे. त्यामुळे ग्राहक आता घरबसल्या सहजपणे आपली स्टेट बॅंक ऑफ इंडियाची शाखा (Transfer Bank Account) बदलू शकतात. यासाठी त्यांना संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाची सुविधा:

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने कोरोना महामारीत ग्राहकांना सुविधा देण्यासाठी ही प्रक्रिया सुरू केली आहे. प्रक्रियेअंतर्गत तुम्ही तुमचे स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे खाते एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करू शकता. यासाठी बॅंकेत जाऊन अर्ज देण्याची आवश्यकता नाही.

ब्रॅंच बदलण्याची ऑनलाईन प्रक्रिया :

पुढील प्रक्रियेचा वापर करून करा बॅंक अकाउंट ट्रान्सफर

✓ शाखा बदलण्यासाटी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर Onlinesbi.com वर जा. तिथे तुम्ही आपला आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
✓ आता ‘पर्सनल बॅंकिंग’ हा पर्याय निवडा आणि युजन नेम आणि पासवर्ड टाका.
आता इथे ई सर्व्हिस टॅबवर क्लिक करा. यानंतर ट्रान्सफर सेव्हिंग्स अकाउंटवर क्लिक करा.
✓ इथे तुम्ही आपल्या अकाउंटला सिलेक्ट करा ज्या अकाउंटला तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहे. याशिवाय तुम्हाला ज्या शाखेत आपले खाते ट्रान्सफर करायचे आहे त्या शाखेचा आयएफएससी कोड टाका.
✓ सर्व माहिती व्यवस्थितपणे चेक करा आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करा. असे केल्यानंतर तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. त्याला भरून कन्फर्म करा.
✓ या प्रक्रियेद्वारे दुसऱ्या बॅंक शाखेपर्यत तुमची रिक्वेस्ट पोचेल. याचा स्वीकार होताच बॅंकेकडून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ब्रॅंच ट्रान्सफरची माहिती देण्यात येईल.
✓ तुम्ही हवे असल्यास योनो एसबीआय, योनो लाईट अॅपद्वारेसुद्धा आपल्या बॅंकेची शाखा बदलू शकता. यासाठी तुमचा मोबाईल नंबर बॅंक खात्याशी लिंक असणे गरजेचे नाही.

नेट बॅंकिग आणि मोबाईल अॅप बॅंकिंग :

अलीकडच्या काळात सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर लोकांना भुरळ पाडून त्यांच्याकडून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे त्यांच्या खात्यातून पैसे गायब केले जात आहेत. अशा प्रकारच्या फ्रॉड किंवा सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया वेळोवेळी आपल्या ग्राहकांना अलर्ट जाहीर करत असते. अलीकडच्या काळात बॅंकिंगची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि सोपी झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे बहुतांश सर्वच बॅंकांनी नेट बॅंकिग आणि मोबाईल अॅप बॅंकिंगची सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बॅंकेच्या शाखेत न जाता बरीचशी कामे ग्राहकांना उरकता येतात. शिवाय ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे चटकन पैसे ट्रान्सफर करता येतात.

कोरोनाच्या संकटकाळात डिजिटल व्यवहारांचे महत्त्व खूप वाढले आहे. नागरिकांवर अनेक निर्बंध असल्यामुळे घरबसल्या ऑनलाईन स्वरुपात बॅंकिंगशी निगडीत अनेक कामे ग्राहकांना उरकता येत आहेत. बॅंकांनीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक ऑनलाईन सुविधा सुरू केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *