अबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..!

| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, सोशल मीडिया यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देखील कोरोनाच्या काळापासून सोशल मीडियावर अधिक ॲक्टीव्ह आहेत. भाषणांमुळे युट्युबकडून दरमहा आपल्याला 4 लाख रुपये दिले जातात. हे पैसे कोरोनासंदर्भातील कामासाठी देणगी म्हणून दिल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच कोरोना कालावधीत आलेल्या अनेक अनुभवांवर पुस्तक लिहिले असून, या पुस्तकाच्या 10 हजार इंग्रजी प्रती प्रकाशित होण्याआधीच विक्री झाल्याचे गडकरी म्हणाले.

देशातील विद्यापीठांमधील कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संवाद साधला.

यावेळी गडकरीनी सोशल मीडियाचा उपयुक्तता अन् आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल यावर भाष्य केले. कोरोनामुळे युष्यावर झालेला परिणाम तसेच स्वत:च्या यूट्यूब चॅनेलवरुन महिन्याला किती कमाई होते, अशा अनेक गोष्टींसंदर्भात भाष्यं केले. गडकरी म्हणाले की, यापूर्वी मी फारसा सोशल मीडियावर नव्हतो.

पंतप्रधान मोदी आम्हाला यासंदर्भात माहिती देत यावर सक्रीय राहण्याचा आग्रह करायचे. मात्र मला ते जमत नव्हते. मात्र, कोरोनामुळे सोशल मीडियावर सक्रीय झालो. कोरोनामुळे आयुष्यात मोठे दोन ते तीन बदल झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. मोबाइलवर गाणी ऐकण्याबरोबरच युट्यूबवर अनेक व्हिडीओ पाहतो. रोज सकाळ संध्याकाळ मी 25 मिनिट पायी चालतो. कोरोना कालावधीमध्ये जवळपास 950 व्हिडीओ कॉन्फरन्स घेतल्या. या कालावधीमध्ये ट्विटरवर 1 कोटी 20 लाख फॉलोअर्स नव्याने जोडले गेल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.