मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

लोकसभा :- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान गात होते त्याची क्लिप मुख्यमंत्र्यांनी भर सभेत ऐकवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत घणाघाती टीका केलीय.  सरडे रंग बदलतात मात्र इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा राज्याने पाहिला नसल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केलीय.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा घेतली.  मुंबई ठाण्यानंतर वाघाची डरकाळी, हिंदुत्वाची डरकाळी इथं घुमली होती या शहरात असं सांगत यावेळी नो खैरे ओन्ली भुमरे आता एकच मामा भुमरे मामा असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगतिलं. इथली जनता शिवसेनेवर धनुष्य बाण वर प्रेम करते, दोघांच्या  भांडणात तिसऱ्याचा लाभ नको, इथं महायुती जिंकायला हवी असं आवाहनही त्यांनी केलं. 

या देशाला पुढं न्यायचं असेल, प्रगती करायची असेल तर आपल्याला फक्त पंतप्रधान म्हणून मोदी पाहिजेत. मोदी सरकार आल्यापासून देशात एकही बॉम्बस्फोट झाला नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे म्हणून यांनी मला हिनवलं, पण राज्यातील जनता तुम्हाला घरी बसवेल, तशीही तुम्हाला घरी बसायची सवय आहे, उंटावरून शेळ्या हाकणारे तुम्ही, असा घणाघात शिंदे यांनी केला. बाप एक नंबरी बेटा 10 नंबरी असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.

मी हेलिकॉप्टरने जातों शेती करायला जातो अशी टीका माझ्यावर केली जाते, पण गाडीने गेलो तर 8 तास लागतील त्या वेळात मी राज्याचा हजार फाईल सही करतो, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मूठ माती देणारे आहात, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारे तुम्ही आहेत, आम्ही शिवसेनेचे खच्चीकरण थांबवायला बाहेर पडलो सत्तेला लाथ मारून गेलो. जर आम्ही चुकीचे पाऊल उचलले असते तर भुमरे च्या रॅली ला इतके लोक आले असते का
तुम्हाला ते एयरे गैरे माहिती आहे ना त्याबाबत बोलून मी तोंड खराब करणार नाही. तुम्ही जाहीरनामा काढू नका, माफी नामा काढा, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. दलितांना मुस्लिम लोकांना फक्त वोट बँक म्हणून वापरत असल्याची टीकाही मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *