लोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी

गोळी विरुद्ध गांधी

बापू..
त्यांनी तुझ्यावर
तीन गोळ्या झाडल्या !

तू मेला नाहीस
पुन्हा पुन्हा उगवत राहिलास
तनात, मनात, शेतात, रानात… कुठं कुठं !

आता त्यांनी
गोळ्यांचे कारखानेच काढलेत !
बघू या..
गोळ्या संपतात
की गांधी पुन्हा तरारून येतो !

– ज्ञानेश वाकुडकर, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *