‘तारक मेहता…’ मधून तिसऱ्या सोनूचीही अचानक एक्झिट? निर्माते चौथ्या सोनूच्या शोधात!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकापैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असित मोदी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीचं अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीसोबतची केस हरलं. आता सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानीनं देखील या शोतून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. 

टेलीटाइम्सच्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानीनं अचानक असित मोदी यांच्या मालिकेला रामराम केला आहे. दरम्यान, शो सोडण्याचं कारण अजून समोर आलेलं नाही. पलक सिंधवानी किंवा तारक मेहताच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

पलकनं तिच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले होते त्यात ती खूप आनंदी असल्याचे पाहायला मिळते. त्यावेळी तिच्या बर्थ डे पार्टीत सुनयना फोजदार आणि सचिन श्रॉफनं हजेरी लावली आहे. तिच्या वाढदिवसाला तारक मेहताच्या टीममधून फक्त दोनचं लोक आल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. तर पलकनं दोन वर्षांपूर्वी तिच्या मेहनीत्या कमाईनं स्वत: च्या हिंमत्तीवर घर खरेदी केलं. तिचा हा फ्लॅट 3BHK चा आहे. तर ती जय हिंद या कॉलेजमधून शिकली आहे.

पलक सिंधवानीनं 2019 मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये सोनूच्या भूमिकेत आधी निधी भानुशालीची जागा घेतली होती. शोमध्ये तिला सोनूच्या भूमिकेत प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. पलकच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिनं या आधी ‘हॉस्टेज’ या वेब सीरिजमध्ये मिनी ही महत्त्वाची भूमिका साकारली होती.

नुकताच पलकनं तिचा वाढदिवस साजरा केला होता. त्यापार्टीतील काही फोटो सोशल मीडियावर पलक सिंधवानीनं शेअर केले होते. त्यात फक्त दोनचं कलाकारा यावेळी दिसले. फक्त पलक नाही तर तिच्या आधी देखील अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. पलकच्या आधी या मालिकेतील अभिनेता शैलेश लोढा पासून राज अनादकटपर्यंत अनेकांनी ही मालिका सोडली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *