रोहित शर्माला नीता अंबानी यांनी पुन्हा दिली का कर्णधारपदाची ऑफर, जाणून घ्या नेमकं काय घडलं…

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या संघात बदलाचे वारा वाहायला लागले आहेत, असे दिसत आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी रोहित शर्माला पुन्हा एकदा कर्णधारपदाची ऑफर दिल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. पण ही गोष्ट नेमकी कशी आणि कुठे घडली, हेदेखील आता समोर येत आहे.

मुंबई इंडियन्यच्या संघाला वानखेडेच्या घरच्या मैदानात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ निराश झाला होता. संघाच्या मालकीणही निराश असल्याचे म्हटले जात होते. चौथ्या सामन्यासाठी बराच अवधी असल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला जामनगर येथे नेण्यात आले होते. सध्या संघ निराश आहे, त्यामुळे त्यांना उभारी मिळण्यासाठी जामनगरला नेण्यात आले होते. जामनगरमध्ये संघ पुन्हा एकत्र येईल आणि त्यांच्यामधील नातं अधिक सुदृढ होईल, असे संघ मालकांना वाटत होते. पण जामनगरमध्ये संघाच्या कॅप्टन्सीवर जोरदार चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

मीडिया रीपोर्ट्सनुसार, जामनगरमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ दाखल झाला. त्यानंतर बराच वेळ मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत चर्चा झाली. मुंबईला तिन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता रोहित शर्माने पुन्हा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्विकारावे, असे नीता अंबानी यांना वाटले. त्यामुळे त्यांनी रोहित शर्माला पुन्हा एकदा कर्णधारपद स्विकारण्याची विनंती केल्याचे म्हटले जात आहे. कारण रोहितने पाच जेतेपदं मुंबई इंडियन्सला जिंकवून दिली आहेत. रोहित हा बराच वर्ष मुंबई इंडियन्सच्या संघात आहे. त्यामुळे तो नीता अंबानी यांची ऑफर नाकारणार नाही, असे म्हटले जात आहे. पण रोहित यावर काय निर्णय घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष असेल.

मीडिया रिपोर्ट्समधून काही गोष्ट समोर आल्या असल्या तरी मुंबई इंडियन्समधील सूत्रांनी या गोष्टीला नकार दिला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ हा जामनगर येथे दोन दिवस होता. पण यावेळी संघातील खेळाडूंमधील वातावरण अधिक चांगले व्हावे, यासाठी नेण्यात आले होते. या दोन दिवसांमध्ये कर्णधारपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मूळात जामनगर येथे खेळाची कोणतीही चर्चा झाली नाही. फक्त खेळाडूंना थोडा आराम मिळावा, एका वेगळ्या वातावरणात ते जाऊन फ्रेश व्हावेत, हाच मुंबई इंडियन्सच्या संघ मालकांचा मानस होता.

नीता अंबानी यांनी रोहित शर्माला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर दिल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत अधिकृतपणे कोणीही काही सांगितलेले नाही. त्याचबरोबर या गोष्टीचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही गोष्ट आलेली असली तरी याबाबत कोणीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे याबाबत आता मुंबई इंडियन्सचा संघ किंवा रोहित शर्मा काही सांगणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *