
( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..!)
तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..
तू ढाल अन तलवार तू, सैनिक तू सरदार तू..
योगी तसा सम्राट तू, साधा तसा भन्नाट तू..
तू मोकळ्या माळापरी, रानापरी घनदाट तू!!
तू पोर्णिमा, तू चांदणे,ठिणगीही तू, ज्वालाही तू..
तू वेदना, संवेदना, तू कुंचला, भालाही तू..
तू गर्जना, हळुवार तू, तू बासरी, रणशिंग तू..
फेसाळती मैफिल तू, जगण्यातली अन झिंग तू !!
शब्दात तू, रेषात तू, रागात तू, त्वेषात तू..
इन्कार तू, स्वीकार तू, स्नेहात तू, द्वेषात तू..
आभाळ तू, आधार तू, रक्तातला विश्वास तू..
कधी भासला सर्वस्व तू, कधी भासला आभास तू !!
पहाडात तू, रानात तू, झाडात तू, पानात तू..
स्वप्नात तू, श्वासात तू, मंत्रापरी कानात तू..
तू पेरला पुरुषार्थ अन आभाळही केले खुले..
तुझीयाविना बापा कुठे जातील ही वेडी मुले ?!
– ज्ञानेश वाकुडकर, नागपूर
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..