Made In India : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यंच्या हस्ते गुरुवारी मुंबईतील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच आयआयटीमध्ये स्वदेशी निर्मिती असलेल्या कॅन्सर नियंत्रक रिसेप्टर टी-सेल (कार-टी) थेरीपीअंतर्गत येणाऱ्या नेक्सकार 19 थेरीपीचं लॉन्चिंग केलं.
यावेळेस बोलताना राष्ट्रपती मूर्मू यांनी हे स्वदेशी बनावटीचं तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करुन देणं ही कॅन्सरविरोधी लढाईतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे असं म्हटलं. तसेच शैक्षणिक संस्था आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी एकत्र येऊन अशी सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक द्रौपती मूर्मू यांनी केलं. राज्यपाल रमेश बैसही या कार्यक्रमाला उपस्थित होते.