लोक काव्य : ‘ बाप ‘ नावाची आई..!

रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..
आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..।
बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..
उसवलेल्या आयुष्याला सांधणारा सुईमधला धागा ..।।

रडणारी हसणारी गाणारी आई दिसतेच सगळी कडे..
आवंढा गिळतांना अश्रु पिणारा बाप मात्र कुठेच दिसत नाही..।
बाप नसेलही मायेचा सागर पण कष्टाचा डोंगर मात्र बापच असतो…
डोंगरात फुटलेला प्रत्येक झरा बापाच्याच मायेने भरलेला असतो..।।

सरत राहीला बाप,
आयुष्याच्या कढईखालचं सरपण होवून ..
अन जगवत राहीला लेकरं चुलीवरचं आंदण बनून..।
हल्ली वाचत असतो बाप माझचं आयुष्य पुस्तकाचं पान बनून..
अन् लिहीत असतो भविष्य हातामधली लेखणी होवून..।।

बापाचं जगणं ना कूणाच्या मनाला भावलं..
ना पूस्तकाच्या पानात मावलं..।
लिहलं असेलही लाखोंनी आईवर ..
पण त्या लाखोनांही बापानेचं घडवलं..।।

हाड झीजत गेली बापाची पण कणा मात्र ताठच होता..।
असेल कुणासाठी काही पण माझ्यासाठी बापसुद्धा आईच होता..।।

विकास नवाळे..
मुख्याधिकारी भडगांव नगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published.