आये हो निभाने को जब, किरदार
तो कुछ ऐसा कर चलो कि ज़माना मिसाल दे।
हे तंतोतंत लागू होते ते म्हणजे आपले लाडके खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना..!
आज गणपती पुळे येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री यांनी अंबरनाथ मधील शिव मंदिर परिसराला पुनर्जीवित करून त्यास गतवैभव मिळून दिले म्हणून जाहीर खासदार श्रीकांत यांचे कौतुक केले..! आणि त्या कामाचा आदर्श सर्वांनी घ्यावा असा सल्ला देखील दिला..
अंबरनाथ मधील शिव मंदिर हे ११ व्या शतकात बांधलेले हेमाडपंथी मंदिर..! शिवाचे जागृत देवस्थान म्हणून चिरपरिचित..! अगदी प्राचीन दस्तावेजात देखील त्याचा उल्लेख आहे. परंतु त्याची अवस्था, परिसराची अवस्था अतिशय वाईट अशीच होती. आजूबाजूला प्रचंड घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी, मंदिर परिसरातले तुडुंब भरून वाहणारे नाले सगळेच अगदी गचाळ असेच होते..
परंतु म्हणतात ना तरुणांना आव्हान स्वीकारायला जास्त आवडते.. तेच घडले.. ज्याचा कायापालट होईल असे कुणालाच वाटत नव्हतं, ते करण्याचं शिवधनुष्य पेलले ते आपल्या खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीच..!आणि त्यांना साथ लाभली ती शहरप्रमुख अरविंद वाळेकर, अंबरनाथ नगरपालिका आणि सर्व पदाधिकारी , लोकप्रतिनिधी व शिव भक्तांची..! आवड , कार्य तत्परता याहून वेगळी ती असते काय..!?
“अगर तुम्हें कुछ करने की इच्छा हो तो दुनिया में कोई काम असंभव नहीं है”
हेच खरे..!
आज आपण शिवमंदिर परिसरात जावून आलात तर आपल्याला हे बदलले रूप कळेल.. आता गेल्या काही वर्षांपासून तिथे शिव मंदिर आर्ट फेस्टिवल भरतो.. भारतातील नामांकित कलाकारांची जणू मैफिलच भरते तिथे..! गायक, वादक, चित्रकार, नृत्यकार असे आपल्या क्षेत्रात उत्तुंग दर्जा मिळवलेले कलाकार शिव महोत्सवात येतात..! ११ व्या शतकात मंदिर परिसरात ज्या नयनरम्य सकारात्मक लहरी उत्सर्जित होत असतील त्या खासदारांनी पुन्हा उर्जित अवस्थेत आणल्या हे काम थक्क करणारे असेच आहे.. म्हणूनच या विकासाच्या कार्यशील राजकारण्याला सलाम …!