सर्वात आधी मी खेद व्यक्त करतो, की हे तीन शब्द आज मला वापरावे लागत आहेत. मी यापूर्वी कधीही ते त्यातील कुत्सित अर्थानं, भावनेनं वापरलेले नाहीत. मी माझ्या लिखाणातून कठोर टीका करतो. रोखठोक लिहितो. सर्वांसाठी एकच नियम, या सूत्रानुसार लिहितो. आपला परका बघत नाही.
–
मात्र मी बिल्ला, रंगा, तडीपार हे शब्द बरेचदा वापरलेले आहेत. त्यात मला आक्षेपार्ह काही वाटत नाही. कारण ती विशेषणे आहेत. त्या त्या व्यक्तीचे गुणविशेष स्पष्ट करणारे आहेत. एखाद्या व्यक्तीचं सामाजिक, राजकीय चारित्र्य अधोरेखित करणारे आहेत. वाचकांना किंवा समाजाला त्यांच्या समोरील भयानक वास्तवाची जाणिव करून देणारे आहेत. रोग जेवढा भयंकर तेवढाच इलाजही कठोरपणे करावा लागतो.
–
आज मात्र हे शब्द वापरायला लागावे, याला जबाबदार स्वतः चंपा आहेत. त्यांनी पक्ष मीटिंग मध्ये बोलतांना ‘लोक आम्हाला चंपा म्हणतात, कुणी टरबूजा म्हणतात, हे कार्यकर्त्यांनी ऐकून घेता कामा नये, त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे..’ अशी केविलवाणी आळवणी आपल्या लोकांना उद्देशून केली. तो वीडियो बघून मला हसू आवरेना. म्हणून हा लेख लिहायला हवं असं वाटलं !
–
एका मग्रूर आणि उन्मत्त मानसिकतेची सहा महिन्यात झालेली केविलवाणी अवस्था बघून हसण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. २०१४ नंतरची भाजपा म्हणजे भारतीय राजकारणातील विकृतीचा कळस होता. अजूनही आहे. पण डिजेचा आवाज आता फाटायला लागला, हेही सत्य आहे. सारा देश उध्वस्त व्हायला आलाय आणि तरीही ह्या बिनडोक लोकांची दिवाळखोरी अजूनही सुरूच आहे. अर्थात असल्या लोकांच्या हातात ज्या मतदारांनी दुसऱ्यांदा गैरसमजातून वा भावनेच्या भरात सत्ता दिली, ते या परिस्थितीला जास्त जबाबदार आहेत. विशेषतः मीडिया तर उकिरड्यामध्ये तोंड खुपसण्यातच अजूनही व्यस्त आहे. मात्र अलीकडे चुकीची जाणीव त्यातल्या काही लोकांना व्हायला लागली आहे, याची कबुलीच चंद्रकांत पाटील यांच्या केविलवाण्या अवस्थेतून दिसून येते. अशी अवस्था कोणताही पक्ष किंवा व्यक्तीच्या दृष्टीने धोक्याची आहे. दुर्दैवानं आपल्या देशातील सर्वात मोठ्या असलेल्या पक्षाची लायकी बघून लाज वाटावी, अशीच परिस्थिती आहे. अशावेळी त्यांनी आत्मचिंतन केलं तर यातून बाहेर निघण्याचा मार्ग देखील मोकळा होईल. अर्थात, त्यासाठी इमानदारीनं गांधींची मदत घ्यावी लागेल. ( पण त्यांच्या रक्तात इमानदारी हा शब्द आहे का, याची टेस्ट मात्र त्यांनी आधी करून घ्यायला हवी. कारण त्यांचं रक्त गोडसे ब्रांडचं आहे. )
–
या निमित्तानं एक जुना प्रसंग आठवला. राहुल गांधी यांनी संसदे मध्ये ‘पप्पू पप्पू कहकर मेरा मजाक उडाते हो..’ अशी व्यथा मांडली होती. आणि तेव्हा स्वयं घोषित प्रधान सेवक ज्या नीचपणानं हसत होते, त्यावरून असली व्यक्ती या देशाला पंतप्रधान म्हणून लाभली, याची मला लाज वाटली होती. आजही वाटते. तो चेहरा आठवला की किळस येते !
–
खरं तर पप्पू हा शब्द तितका काही वाईट नाही. तडीपार, रंगा, बिल्ला यांच्या तुलनेत तर काहीच नाही. म्हणजे खानदानी लांडग्यांच्या टोळीने एखाद्याला सशाचं पिलू म्हणून डिवचावं, तशातला हा प्रकार होता. पण भाजपाच्या मतिमंद टोळीने भरपूर टवाळी केली. ( काँग्रेस वाल्यांना तो हल्ला, परतवून लावता आला नाही, हे त्यांचं अपयश ! )
–
चंपा हा शब्द काही आक्षेपार्ह नाही. नावाचा शॉर्ट फॉर्म वापरणे ही तर लोकप्रिय पद्धत आहे. तशी फॅशन सुद्धा आहे. ( झालंच तर चंपा या शब्दाला रोमँटिक वारसा पण आहे..! ) त्यात त्यांना वाईट वाटण्याचं कारण नव्हतं. मात्र टरबुजा असं संबोधन निश्चितच आक्षेपार्ह आहे ! ते वैयक्तिक आहे ! अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात. पण विकृतीचा सामना एखाद वेळी विकृतीने पण.. ( लोहा लोहेको काटता है..या धर्तीवर ) नेहमी संस्कृतीने केला पाहिजे.
–
भाजपा किती हतबल झालेली आहे, हे त्यांच्या ‘सरकार पडणार, सरकार पडणार’ या निर्लज्ज केकाटण्यावरून सर्वांना कळते. या सत्तापिसाट लोकांना वेळ काळाचं देखील भान राहिलं नाही. अख्खा पक्षच मानसिक बिमार असावा, अशी शंका चंद्रकांत पाटील यांच्या उलट्या बोंबा ऐकल्यानंतर वाटायला लागते. आपण काय बोलतो याची या लोकांना जरा देखील शुद्ध राहिली नाही. ‘हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी बाहेरच्या मिडीयाला मुलाखत देवून बघावी’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. यालाच म्हणतात आभाळाकडे पाहून थुंकणं ! इथे मला उद्धव ठाकरे यांची बाजू घ्यायची नाही. त्याचं ते आपसात बघून घेतील. पण आपला स्वतःचा सर्वोच्च नेता, काय लायकीचा आहे, त्याच्या बद्दल लोक काय बोलतात, त्यामुळे आपली थुंकी सरळ आपल्या नेत्याच्या तोंडावर जाऊन पडेल’ याचं भान पाटील सारख्या नेत्याला असायला नको का ? की जनतेला हे एकदम मूर्ख समजतात ? पण भाजपची एकूण मानसिक अवस्था काय असेल याची कल्पना मात्र यातून स्पष्टपणे करता येते. त्यांच्या या ‘हाय मैं लूट गयी’ स्टाईल विलापातून पुढील निष्कर्ष निघू शकतात..
• भाजपची ट्रोल गँग आता पार कंडम झाली आहे.
• भाजपाचा राजकीय आत्मविश्वास पार उध्वस्त व्हायला आला आहे.
• भाजपा अंतर्गत खिळखिळी झालेली आहे. बाकी नेते आता मनातल्या मनात हसून मजा घेत आहेत.
• त्यामुळे खरे लाभार्थी असलेल्या लोकांना दिल्लीच्या चड्ड्या धुण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिलेला नाही.
• इतर विरोधी पक्ष शेपटी टाकून बसले असले तरी, भाजपा विरुद्धची लढाई आता लोकशाहीवादी, समतावादी युवक आणि इतर जनतेनं हातात घेतली आहे.
• भाजपा हा आता सर्वांचा कॉमन दुश्मन झालेला आहे. त्यामुळे पैसा फेकुनही त्यांना हवातसा प्रतिसाद मिळत नाही.
• एन्काऊंटरच्या तावडीत सापडलेल्या मोठ्यात मोठ्या गुंडाला देखील मरत नाही, तोवर पळत रहा, या शिवाय पर्याय नसतो, तशी अवस्था यातल्या काही लोकांची निश्चितपणे झालेली आहे. सरेंडर व्हायचं म्हटलं, तर गँगचा बॉस उडवतो, नाही झालो तर पोलीस गेम करणार !
–
त्यामुळेच हे लोक आता काहीही बरळत सुटले आहेत, असं दिसते. अन्यथा मोठमोठ्या लोकांना निर्दयपणे ट्रोल करणारी, फुरोगामी, देशद्रोही, नक्षलवादी ठरवून खिदळणारी ही पिलावळ, एवढ्या केविलवाण्या अवस्थेत आली नसती. ट्रोलर्स पासून वाचवा म्हणायला, पोलीस स्टेशन मध्ये गेली नसती. त्यातून काहीही हाती लागलं नाही, म्हणून यांनी आता खानदानी उलट्या बोंबा मारायला सुरुवात केलेली आहे, असे दिसते ! म्हणजे यांनी महात्मा गांधींपासून साऱ्या नेहरू, गांधी घराण्याचं चारित्र्यहनन केलं तरी चालेल, मात्र हे सारा गाव नागड्यानं फिरून आलेत, तरी यांना काही बोलायचं नाही !
–
शेवटी कोंबडी ती कोंबडी आणि मोरनी ती मोरनी ! प्रत्येकानं आपापल्या मर्यादेत राहणं हाच योग्य पर्याय आहे. कारण या देशाचा सातबारा कुणाही एकाच्या बापाच्या नावावर नाही ! १३० कोटी लोकांची त्यावर नावं लिहिली गेली आहेत, हे लक्षात ठेवून वागणं, ह्यातच शहाणपणा आहे ! असो..
तूर्तास एवढंच..
–
ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर अभियान
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .