मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावत आहे. आपल्यावर असणारी प्रत्येक जबाबदारी पार पाडणाऱ्या या अभिनेत्रीने आता मात्र कोरोना व्हायरसचा जगभरात वाढता संसर्ग पाहता एक मोठा निर्णय घेतल्याचं कळत आहे.
कोरोनाचा फटका एका अर्थी दीपिकालाही बसला आहे. कारण, अतिशय मानाच्या अशा समजल्या जाणाऱ्या पॅरिस फॅशन वीकमध्ये न जाण्याच निर्णय तिने घेतला. लूई वीटॉन या ब्रँडशी जोडली गेली असल्यामुळे दीपिकाला या कार्यक्रमाचं बोलावणं आलं होतं. तेथे न जाण्याचा निर्णय तिने घेतला.
दीपिकाच्या प्रवक्त्यांकडून याविषयीचं पत्रकही जारी करण्यात आलं.