
| मुंबई | आर्थिकदृष्ट्या सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ओळख आहे. मात्र, याच बलाढ्य आणि श्रीमंत बीसीसीआयच्या दिरंगाईमुळे या काेराेनाने संकटात सापडलेल्या कर्णधार विराट काेहली, राेहित शर्मा, जसप्रीत बुमराहसह २७ खेळाडूंना माेठा फटका बसला आहे. करारबद्ध असलेल्या २७ खेळाडूंना अद्याप त्यांचे हक्काचे मानधन बीसीसीआयने दिले नाही. त्यामुळेच या श्रीमंत बाेर्डाकडे या २७ खेळाडूंची तब्बल ९९ काेटींची थकबाकी आहेे. याशिवाय याच खेळाडूंना मागील १९ सामन्यांतील मानधनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे हे खेळाडू आर्थिकदृष्ट्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. डिसेंबरपासून बीसीसीआयकडील चीफ फायनान्शियल पदच रिक्त आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली, राेहित, बुमराह यांच्यासह २७ खेळाडूंना मागील दहा महिन्यांपासून करारापाेटी मिळणारे पैसेच बीसीसीआयकडून मिळाले नाहीत. यामध्ये ग्रेडनुसार मिळणाऱ्या मानधनाचा समावेश आहे. ग्रेड एमधील सहभागी विराट काेहली, राेहित शर्मा, बुमराह यांना प्रत्येकी सात काेटी मिळतात. बीसीसीआयकडून वार्षिक मानधन ए, बी आणि सी ग्रेडसाठी अनुक्रमे ५, ३, १ काेटी अशा स्वरूपात मिळते. यासाठी ग्रेड एमध्ये ११, बीमध्ये ५ व सीमध्ये ८ खेेळाडूंचा समावेश आहे.
१५ काेटींचे मानधन मिळेना :
२७ खेळाडूंना डिसेंबर २०१९ नंतर झालेल्या २ कसाेटी, ९ वनडे व ८ टी-२० चे मानधन मिळाले नाही. एक कसाेटी १५ लाख, वनडे ६ लाख व टी-२० साठी ३ लाखांचे मानधन दिले जाते. त्यामुळे कसाेटीसाठी बाेर्डाकडे खेळाडूंची ४ काेटी २० लाख, वनडेचे ७ काेटी ५६ लाख व टी-२० चे ३ काेटी ३६ लाखांचे मानधन रखडलेे आहे.
फायनान्शियल अधिकाऱ्याचे पद रिक्त :
डिसेंबरपासून बीसीसीआयमधील चीफ फायनान्शियलचे पद रिक्त आहे. हे पद अद्याप भरण्यात आलेले नाही. त्यामुळे करारबद्ध खेळाडूंच्या मानधन आणि मॅच फी देण्याबाबत काेणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री