| मुंबई | आपण कोविड-१९ विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. या विषाणूपासून बचावासाठी आज मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा स्वच्छतेसाठी वापर होत असला तरी सॅनिटायझरच्या अतिवापराने त्वचेला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे वेळीच सावध होऊन हे लक्षात घेण्याची गरज आहे, असा इशारा केंद्रीय आरोग्य विभागाने दिला आहे.
नक्की काय होतो त्वचेवर परिणाम?
सॅनिटायझरच्या अतिरेकी वापराने त्वचेला स्वस्थ ठेवणारे चांगले विषाणूही मरतात. त्यामुळे हे विषाणू नसल्याने त्वचेचे संरक्षण होत नाही आणि मग हातावर फोड येण्यासारखे प्रकार घडतात. या आणि असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने हा इशारा दिला आहे. त्यामुळे आता त्वचेची काळजी घेण्यासाठी सॅनिटायझरचा किती वापर करावा, हे लक्षात घ्या असे आरोग्य विभागाने सूचीत केले आहे.
कोरोना विषाणूचा फैलावर देशभर पसरल्यानंतर गेल्या सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीत सॅनिटायझरचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आल्यामुळे आरोग्य विभागाने हा सल्ला दिला आहे. त्यामुळे यापुढे गरज असेल तरच सॅनिटायझरचा वापर करा. अन्यथा साबणाने हात धुणे केव्हाही चांगले, असे केंद्राच्या आरोग्यविभागाने स्पष्ट केले आहे.
साबण आणि पाण्याचा पर्याय जिथं उपलब्ध नाही केवळ त्याच ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करावा अन्यथा साबणाने स्वच्छ हात धुतले तरी पुरेसे असल्याचं आरोग्य विभागाने म्हटले आहे. त्यामुळे किती वापर करायचा हे आता तुम्हालाच ठरवावे लागणार आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .