गेल्या एक दोन दिवसांपासून पत्रीपूलाच्या पत्र्यावरून काही माकडे आकड तांडव करताना दिसत आहेत..!_ पत्रीपूल हा कल्याणच्या बकाल राजकारणाचा जातिवंत नमुना बनला आहे, हे यावरून सिद्ध होते, हे मात्र नक्की..!
फेब्रुवारी २०२० रोजी पत्रीपूल पूर्ण करणार या शिवसेनेच्या वचनाच्या जुन्या बॅनर वर काही माकडे टीका करत आहेत आणि ती एका विशिष्ट पक्षाशी संबंधित आहेत, हेही सहज लक्षात येते.. त्या माकडांसाठी व त्यांच्या डोंबाऱ्यांसाठी हे काही प्रश्न..! याच उत्तर कल्याण – डोंबिवलीकर सर्वसामान्य तर देतीलच पण या माकडांनी स्वतः लाज न वाटू देता याची उत्तरे शोधावीत…!
• प्रश्न १ – कल्याण डोंबिवली करिता ५ वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेले कितीतरी शे कोटी रुपये नक्की कोणत्या पुलावर अडकले..?
प्रश्न २ – कल्याण डोंबिवली मनपा आणि परिसरातील २७ गावांचा पुळका असलेले नेते आणि कार्यकर्ते यांना तत्कालीन मुख्यमंत्री यांनी कोणते आश्वासन दिले होते..? आणि ते आश्वासन कोणत्या पुलात गाडले गेले?
प्रश्न ३ – कल्याण ते कोन या दरम्यान असणाऱ्या दुर्गाडी येथील पुलाची कालमर्यादा कितीदा वाढवली..? तेंव्हा कोणते बॅनर या डोंबाऱ्यानी लावले होते..?
• प्रश्न ४ – कल्याण टिटवाळा बाह्यवळण रस्ता आपल्या काळात नक्की कोणत्या पुलावर अडकला होता..?
प्रश्न ५ – पत्रिपूलाच्या कामासाठी वापरले जाणारे गर्डर पाहण्यासाठी आपले कोणी हैदराबाद पर्यंत गेले होते का..?
• प्रश्न ६ – पत्रीपूलामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीच्या समस्येवर आपले कोणी रस्त्यावर येऊन त्याच्या संचलनासाठी सामील झाले होते का..?
असे अनेक प्रश्न आहेतच, अगदी कचराभुमी पर्यंतचे..! या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दाखवून देईल की किती बेगडे पणे ही माकडे आपले नाक खाजवत आमचीच लाल आहे असे म्हणत नको ते प्रश्न विचारत आहेत आणि अनावश्यक टीका करत आहेत.!
पत्रीपूलाचे काम वेळेत पूर्ण झालेच कसे..? या मुळे अधिक पेटून उठून काही तथाकथित पडेल कार्यसम्राट आपली अक्कल पाजळत असल्याचे पाहून त्यांच्या बुद्धीची कीव येते..! रखडलेली सगळी कामे मग ती २७ गावां संबंधित असतील किंवा दुर्गाडी पुलाचे किंवा पत्रीपुलाचे असेल ही तत्परतेने मार्गी लागत असल्याने यांचा तिळपापड होणे साहजिकच आहे.. त्यामुळे बुडाला लागलेली आग थंड करण्यासाठी यांचे चालू असलेले हे प्रयत्न नक्कीच वाखण्याजोगे आहेत..! तूर्तास इतकंच..!