| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. यंदा या जागांमध्ये सात हजार १४० जागांची वाढ झाली आहे. १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध असून प्रवेशासाठी एकूण १ लाख ४५ हजार ५३२ जागा आहेत.
आयटीआय महाविद्यालये कधी सुरू होतील याबाबत लॉकडाऊन संदर्भात शासन नियमास अनुसरून नंतर माहिती जाहीर करण्यात येईल. सध्या फक्त प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करत असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.
राज्यात ३५८ तालुक्यांत ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. तसेच राज्यात ५६९ खासगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे.
शासकीय आणि खासगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ५३२ विद्यार्थी आहे. नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी १ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर काळात मुदत दिली जाईल आणि २१ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच जिल्हानिहाय समुपदेशन फे-या २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या दरम्यान पार पडणार असून खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरावरील प्रवेश १६ ऑगस्टपासून पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
असे आहे वेळापत्रक:
• प्रवेशाचे वेळापत्रक (सकाळी ११ ते सायं. ५ पर्यंत)
• ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश
• अर्ज शुल्क भरणे – १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट
• पहिल्या फेरीसाठी संस्थानिहाय प्राधान्य सादर करण्यासाठी नोंदणी करून लॉगइन आयडी व पासवर्ड सादर करणे – २ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट
• प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना एसएमएसद्वारे कळविणे – १६ ऑगस्ट (सकाळी ११ वाजता)
• गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे आणि माहितीत बदल करणे – १६ आणि १७ ऑगस्ट
• अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे – १८ ऑगस्ट (सायं. ५ वाजता)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .