१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतातील ५६५ संस्थाना पैकी ५६३ संस्थानिकांना भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्यासाठी माउंट बॅटन यानी मुभा दिली. जवळपास काही संस्थाने भारतात विलीन झालेले होते. त्यापैकी काश्मीर, हैदराबाद, जुनागड हे संस्थान भारतामध्ये अजून विलीन झालेले नव्हते. जुनागड संस्थानिक महाबतखान जुनागडचा नबाब होता. या संस्थानांमध्ये ८० टक्के हिंदू २० टक्के मुस्लिम होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जुनागड संस्थान पाकिस्तानमध्ये सामील होत असल्याचे जाहीर केले. १४ सप्टेंबर १९४७ ला जुनागड संस्थान पाकिस्तानमध्ये सामील होत असलेले महाबतखान नबाब यांनी भारत सरकारला कळविले, या निर्णयामुळे संस्थानातील जनतेला धक्का बसला; त्यातूनच जनतेने नबाबच्या विरोधात आंदोलन उभारले. या आंदोलनाला भारत सरकारने पाठिंबा दिला. २६ सप्टेंबर १९४७ रोजी जुनागड या संस्थांनवर लष्करी कारवाई करून भारतात विलीनीकरण करण्यात आले.
काश्मीरचा राजा महाराज हरिसिंह हा होता. काश्मीर मध्ये ७० टक्के लोक मुस्लिम तर हिंदू व इतर धर्माचे ३० टक्के लोक होते. माऊंटबॅटन यांनी राजा हरिसिंग यांच्याशी भारतात विलिनीकरण करण्याबाबत चर्चा केली. राजा हरिसिंग हे काश्मीर संस्थान स्वतंत्र राष्ट्र म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला. तेथील जनता जास्त मुस्लिम असल्यामुळे बॅरिस्टर जीना यांनी ३०,००० पठाण सेना काश्मीर खोऱ्यात घुसवली त्यामुळे राजा हरिसिंग यांनी २४ ऑक्टोंबर १९४७ रोजी भारताची मदत मागितली. २६ ऑक्टोंबर १९४७ रोजी सरदार वल्लभाई पटेल यांनी काश्मीर मध्ये सैन्य पाठवून घुसखोरांना हाकलून दिले काश्मीरचे भारतात विलीनीकरण केले.
हैदराबाद संस्थान अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर इ.स.१२९८ मध्ये कब्जा केला. इस्लामी राजवटीत भारतातील औरंगाबाद सुभा रेव्हेन्यू मध्ये महाराष्ट्रातील तेंव्हाचे औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड हे पाच जिल्हे होते.
औरंगजेबच्या काळात दक्षिण सुभ्याची जबाबदारी पहिला निझाम मिर कमरूद्दीन उर्फ निजाम उल मुल्क पासून म्हणजेच इ.स. १७२४ पासून ते १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत एकूण सात निजाम गादीवर आले. इंग्रजांच्या अधिन राहून निजामास पुढील राजकारण करावे लागले. इ.स.१८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसचे कार्य समजून घेऊन त्यात सहभागी व्हावे असे वाटत होते. परंतु निझामाचा या गोष्टीस पूर्ण विरोध होता.
सातवा निझाम हा जनतेकडून सक्तीने नजराणे वसूल करत. वर्तमानपत्रातून निषेध पर लेख प्रसिद्ध झाल्यामुळे निजामाला ही पद्धती बंद करावी लागली. इ. स. १९११ मध्ये निजाम महेबूब अलीखान मरण पावला आणि मीर उस्मान अली खान सातवा निजाम म्हणून गादीवर आला. आर्य समाजाचा पहिला सत्याग्रह हैदराबाद येथे २४ ऑक्टोंबर १९३८ मध्ये झाला. ते सत्याग्रह ७ ऑगस्ट १९३९ पर्यंत चालला. या सत्याग्रहामध्ये १२००० कार्यकर्ते सहभागी झाले होते. जवळपास हा सत्याग्रह दहा महिने चालला. आर्य समाजाने तयार केलेल्या वातावरणाचा स्टेट काँग्रेसला फायदा झाला. हैदराबाद संस्थानातील लोकांना भारतात सामील होण्याची उत्सुकता होती.
७ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारतात सामील होण्याचे म्हणून पाळले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र ध्वज लावण्याचे आवाहान केले. त्यामुळे निजाम चिडून सर्वत्र अन्याय, अत्याचाराचे धोरण स्वीकारले तरी प्रजा डगमगली नाही. हैदराबाद येथे निजामाचा सेनापती कासीम रझवी हा ‘ रझाकार ‘ या संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील जनतेवर अतोनात अन्याय अत्याचार करत होता.
या अन्यायातून मुक्त करण्यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी रामानंद तीर्थ हे काम पाहत होते. त्यांची चळवळ अनेक वर्षे चालली. स्वामी रामानंद तीर्थ सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली त्यांना चार महिन्याच्या कारावास झाला. सुटका झाल्यानंतर त्यांनी भूमिगत काम केले. त्यांच्यासोबत दिगंबरराव बिंदू , गोविंदभाई श्राफ, नागनाथ परांजपे, रघुनाथ रांजणीकर, गोविंद पानसरे, गोपाळ शास्त्री देव, देवराव पळशीकर, सर्जे गुरुजी, पं.नरेद्रजींनी जगदिश, कोंडा लक्ष्मनजी, दासराव मोहनपुरकर, अनंतराव भालेराव, शंकर भाई पटेल, आशाताई वाघमारे, जीवनराव बोधनकर, नागनाथ परांजपे, आबासाहेब लहानकर, काशिनाथ शेट्टी, शंकर शर्मा, दिगंबर उत्तरवार, दत्तात्रेय उत्तरवार, बन्सीलाल हदगावकर, मल्लीकर्जून बर्डे, राजाराम देशमुख, साहेबराव देशमुख बारडकर, किशोर शहाणे, बाबासाहेब लहानकर, शंकरराव चव्हाण, बाबासाहेब देशमुख गोरठेकर, दत्तराम थेरबणकर, दुर्गाजी पाटील सावंत असे अनेक स्वातंत्र्यसैनिक या लढ्यात सहभागीझाले होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळी साठी पैशाची कमतरता भासू लागली त्यातच गोविंदराव पानसरे व दत्तात्रय उत्तरवार यांचा बदला घेण्यासाठी ३० जानेवारी १९४८ रोजी उमरी येथील हैदराबाद संस्थानातील बँक लुटली त्या बँकेमध्ये जवळपास २१ लाखाची लूट मिळून आले. त्या पैशातून स्वातंत्र्य सैनिकांना शस्त्रास्त्रे व अन्नधान्याची गरज भागवण्यात आले.
निजामाने भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याबरोबर बोलणे सुरू केली. परंतु निजामाच्या हातात कोणतीच सत्ता उरली नव्हती. निजाम नजरकैदेत होता. रजाकारचा पुढारी कासिम रझवी हा होता. या संघटनेच्या जोरावर हैदराबाद संस्थाने स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी चंग बांधलेला होता. भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाई करून १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान हे निजामाच्या तावडीतून मुक्त केले.
– किशन रॅपनवाड सर, सहशिक्षक नूतन विद्यालय हायस्कूल, उमरी जि.नांदेड
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .