| औरंगाबाद | आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना औरंगाबादच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेचा भव्यदिव्य बक्षिस सोहळा महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते एमजीएम विद्यालयाच्या आर्यभट सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. रामराव शेळके यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी श्री. अविनाश गलांडे, शिक्षण सभापती जिल्हा परिषद औरंगाबाद, श्रीमती. अनुराधताई चव्हाण, सभापती, महिला व बालकल्याण, श्री रमेशजी पवार, जिल्हा परिषद सदस्य, श्री बळीरामजी भुमरे, निमंत्रित जिल्हा परिषद सदस्य, श्रीमती कल्पना पतकोंडे विस्तार अधिकारी कन्नड, श्री. योगेश्वर शिसोदे जिल्हा नेते यासह जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक व विजेत्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे –
लहान गट वक्तृत्व स्पर्धा:
प्रथम क्रमांक-अंश अंकुश मनगटे, द्वितीय क्रमांक-ओवी रवि जाधव, तृतीय क्रमांक-हर्षद विनोद साठे.
गीत गायन स्पर्धा-
प्रथम क्रमांक चिन्मय नामदेव पोकळे, द्वितीय क्रमांक-ईश्वरी नंदकिशोर साळुंके, तृतीय क्रमांक- श्रीयश गणेश जारे
कथाकथन स्पर्धा –
प्रथम क्रमांक-स्वरांग सचिन भंडारी, द्वितीय क्रमांक-आर्या अनिकेत मेहकर, तृतीय क्रमांक- हम्माद जावेद शाह तर
मोठा गट : वक्तृत्व स्पर्धा- कोमल अजिनाथ जाधव, द्वितीय क्रमांक-शिवानी संतोष पठाडे, तृतीय क्रमांक-प्रेम परमेश्वर तेलंग
गीत गायन स्पर्धा:
प्रथम क्रमांक-भाग्यश्री जालिंदर थोरात, द्वितीय क्रमांक-अनुज नितीन साळुंके, तृतीय क्रमांक-सोहम गणेश आहेवाड,
कथा सादरीकरण स्पर्धा:
प्रथम क्रमांक-सोहम गणेश भालेराव, द्वितीय क्रमांक-सिध्दी विजय गांगुर्डे, तृतीय क्रमांक-कल्याणी पुंजराम म्हस्के.
वरील सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे व क्रमांकानुसार पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी संदीपान भुमरे यांनी आपल्या मनोगतात कोरोना महामारीच्या कालावधीत लहान विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शिक्षण बरेच दिवस बंद होते, त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नव्हता; म्हणून संघटनेने मुलांच्या हितासाठी हा अभिनव असा उपक्रम राबविला असेच उपक्रम अखंडपणे राबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच विजेत्या विद्यार्थ्यांचे मनापासुन अभिनंदन केले व जुनी पेंशनच्या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करून स्वतः लक्ष देतो अशी ग्वाही दिली. तर श्री. अविनाश गलांडे यांनी जिल्हास्तरावरील शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू असे सांगितले. श्री रामुराव शेळके व श्रीमती अनुराधताई चव्हाण यांनीही विजेत्यांचे अभिनंदन करत शिक्षकांच्या चांगल्या उपक्रमांच्या पाठीमागे नेहमी भक्कमपणे उभे राहू असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून संघटनेचे जिल्हाअध्यक्ष श्री. भिमराव मुंढे यांनी कार्यक्रमाचा हेतु सांगत काही मागण्याही व्यक्त केल्या. या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन श्री. जगन ढोके, विजय लिंबोरे, रवि जाधव, जीवन वाघमारे, सचिन वालतुरे आणि अशोक चव्हाण, ज्ञानेश्वर उभेदळ, गोविंद उगले सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जगन ढोके यांनी केले. पालक प्रतिनिधी म्हणून श्री अंकुश मनगटे यांनी कॅबिनेट मंत्र्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन मुलांच्या जीवनात अविस्मरणीय क्षण आणल्याबद्दल संघटनेचे पालकांच्या वतीने आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अशोक चव्हाण यांनी मानले व खेळीमेळीच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जुनी पेंशन संघटनेचे जिल्हा नेते सचिन एखंडे, राज्य संपर्क नेते लिंबराज भंडारे, राज्य मीडिया प्रमुख दीपिका एरंडे, विभागीय नेते उद्धव बोचरे, योगिनी फटाले, शारदा बोलकर, मनीषा पुंड, रंजिता जाधव, योगेश खरात, जीवन वाघमारे, गोविंद तोटेवाड, संतोष जाधव, विनोद डिके, धनंजय परदेशी, अनिल दाणे, सतीश जाधव, निलेश ससाणे, योगेश मुंडलीक, दिशांत अंबादे, अमोल बेळगे, चंद्रकांत जाधव, उमेश दसपुते आदीसह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .