| पुणे | शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या धर्तीवर इतर सर्वच राजकीय पक्षांनी रुग्णसेवा करण्याच्या उद्देशाने आपापल्या पक्षाअंतर्गत वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली तर एक खूप मोठी वैद्यकीय क्रांती घडेल असे आवाहन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले. पुणे येथे सरकारनामा आयोजित ओपन माईक चॅलेंज या विशेष चर्चासत्रात ते बोलत होते. भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना डॉ शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कामाबद्दल माहिती दिली.
महाराष्ट्र राज्यात सुमारे २४ जिल्ह्यात ४ हजार पेक्षा अधिक निस्वार्थी स्वयंसेवकांच्या माध्यमातून रुग्णसेवेचे कार्य सुरु आहे. डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत राज्यात १०० पेक्षा अधिक सुसज्ज अत्याधुनिक ALS (Advance Life Support ) रुग्णवाहिका मोफत वितरित करण्यात आल्या आहेत. कोविड संकट काळात दुसऱ्या लाटेत जेव्हा oxgen ची कमतरता होती तेव्हा ५०० oxgen concentrators मोफत वितरित करण्यात आले. आजपर्यंत १ हजार पेक्षा अधिक आरोग्य शिबिरांच्या माध्मयातून १ लाख नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले आहे; तसेच १६ हजार नागरिकांच्या शस्त्रक्रिया मोफत किंवा सवलतीच्या दारात करून देण्यात किंवा बिलात सवलत मिळवून देण्यात आम्हाला यश मिळाले असल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली.
यासोबतच २०१८ साली केरळ येथे २०१९ साली सांगली – कोल्हापूर येथे आणि गेल्यावर्षी झालेल्या महाड – चिपळूण येथील महापुरातील मदत कार्यात राज्याचे नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत आपण स्वतः मदत कार्यात सहभागी झाल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
याच संवेदनशील पद्धतीने सर्वच राजकीय पक्षांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे समजून गरजू रुग्णांसाठी कार्य केले तर राज्यातील एकही रुग्ण रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही असा आशावाद यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
याशिवाय कुठल्याही रुग्णाला जात – धर्म – पंथ – पक्ष नसतो या वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीनुसार आमचा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन कार्यरत असून कुठल्याही राजकीय पक्षाचे – संघटनेचे कार्यकर्ते वैद्यकीय मदतीसाठी आम्हाला संपर्क करू शकतात असे आवाहनही शेवटी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .