अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची तुरुंगातून सुटका होणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर येतेय. अरुण गवळीची मुदतीपूर्व सुटका होणार आहे. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सुट देण्याची मागणी केली होती.
अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाली होती. मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे..
मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात तसेच इतर गुन्हेगारी कृत्यासाठी यासाठी अरुण गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या अरुण गवळी नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते.त्यानुसारच डॉन अरुण गवळीची शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती. त्याच्या या मागणीवर न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अरुण गवळी याला खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेत सुट मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याचिका दाखल केली होती. 2006च्या शासन निर्णयानुसार वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या व अशक्त असलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून सुटका करण्याची तरतूद आहे.
त्याचआधारे शिक्षेत सूट मिळवण्यासाठी गवळीने अर्ज सादर केला होता. गवळीच्या याचिकेवर 5 मार्च रोजी सुनावणी पूर्ण झाली होती. निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आज या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
अरुण गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2 मार्च 2017 रोजी ही घटना घडली होती. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अरुण गवळी शिक्षा भोगत होते.