नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. याकाळात मतदानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या फोटोबाबत मोठी चर्चा होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोबाबत एका मतदान केंद्रावर एका महिलेचा हात पकडून मतदान केलं जात असल्याचा दावा केला जात आहे. पण निवडणूक आयोग मात्र काहीच कारवाई करत नाही. न्यूजचेकरच्या फॅक्ट चेक टीमने या फोटोबाबत तपासणी केली.
व्हायरल झालेल्या फोटोबाबत दावा केला जात आहे की, मतदान केंद्रावर महिलेचा हात धरुन मतदान केलं जात आहे, मात्र यावर निवडणूक आयोग गप्प आहे.
व्हायरल फोटोबाबत दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी न्यूजचेकरच्या फॅक्ट चेक टीमने व्हायरल व्हिडिओच्या की-फ्रेम्सला रिवर्स इमेज सर्च केलं. त्यावेळी हा फोटोबाबत २२ मे २०१९ रोजी ‘ट्रायकलर न्यूज नेटवर्क’ नावाच्या यूट्यूब चॅनेलने अपलोड केलेल्या फोटोबाबत मध्ये आढळला.
जवळपास एक मिनिटाच्या या फोटो मध्ये ती महिला पोलिंग एजंटच्या रुपात इतर मतदारांसह ईव्हीएमच्या ठिकाणाला भेट देत असल्याचे आणि तिच्या सूचनेनुसार त्यांना मतदान करण्यास सांगत असल्याचं दिसतं आहे.
तपासात व्हायरल फोटो २०१९ मध्ये शेअर केलेल्या अनेक फेसबुक पोस्ट मिळाल्या. या पोस्ट इथे आणि इथे पाहता येतील. हा व्हिडिओ पाच वर्षांपूर्वी वन इंडिया तमिळद्वारा डेलीमोशन वेबसाइटवरही अपलोड करण्यात आला होता.