| मुंबई | बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. यापूर्वी अभिनेता इरफान खान यांनी लंडनमध्ये कॅन्सरवर यशस्वी उपचार घेतले होते. त्यानंतर भारतात परल्यावर अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या उत्तम चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.
सुजित सरकार यांनी वाहिली श्रद्धांजली..!
My dear friend Irfaan. You fought and fought and fought. I will always be proud of you.. we shall meet again.. condolences to Sutapa and Babil.. you too fought, Sutapa you gave everything possible in this fight. Peace and Om shanti. Irfaan Khan salute.
— Shoojit Sircar (@ShoojitSircar) April 29, 2020