| मुंबई | आज मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नगरविकासचे प्रधान सचिव असलेले इकबाल चहल हे काम पाहतील. तर ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैसवाल यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांना नगरविकास खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे.
कोण आहेत इकबाल चहल..!
- इक्बाल चहल हे १९८९ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत
सध्या इक्बाल चहल हे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत. - इक्बाल चहल यांनी यापूर्वी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलं आहे.
- इक्बाल हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
- वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे.
- केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव आणि ओसडी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
- इक्बाल चहल हे औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही होते.
- तसेच उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून काम पाहिलं असून
म्हाडाचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. - इक्बाल यांचं शिक्षण राजस्थानातील जोधपूर इथं झालं आहे.
- इक्बाल चहल हे शारिरिकदृष्ट्या फिट अधिकारी म्हणून ओळखले जातात. इक्बाल चहल हे २००४ पासून सलग मुंबई मॅरेथॉन मध्ये सहभागी होतात.