वाघांनो असं रडताय काय..? पंकजा मुंडे यांचे भावनिक ट्विट..!



| मुंबई | विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाकडून डावलण्यात आलं आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तोफ डागल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद असल्याचं म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस…साहेबांचे आशिर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद”.

एकंदरित, एका ज्येष्ठ नेत्याला घेतले तर बाकीच्यांसोबत अन्याय होईल, तसेच ज्येष्ठ नेता विधानपरिषदेत आला तर सध्याचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पक्ष नेते पदावर संक्रांत येईल, पुन्हा ज्येष्ठ जोमाने सक्रिय झाले तर आपली पकड वाढवतील.. अश्या अनेक कारणांमुळे नवीन आयारामांसोबत निष्ठावान नवीन नेत्यांना संधी मिळाली असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *