मुंबई- चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगात भयानक रूप धारण केल्याचे चित्र आहे. जीवावर बेतणाऱ्या हा करोना विषाणू सुमारे १९८ देशांमध्ये फैलावला आहे. करोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जवळपास ५० हून अधिक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे.
करोनाच्या संसर्गामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत सुमारे २१ हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला असून जगातील ३ अब्ज नागरिकांना लॉकडाउनमुळे घरातच थांबावे लागले आहे. या आणीबाणीच्या काळात सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
साधारणतः २०१८ मध्ये कोरियन सीरिज My Secret Terrius रिलीज झाली. सप्टेंबर २०१८ मध्ये नेटफ्लिक्स वर आलेल्या या सीरिजचीच चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. यात कोरियन अभिनेता जी-सब याने सीक्रेट एजन्टची भूमिका साकारली आहे. याशिवाय या सीरिजमध्ये जुंग-इन-सुन, सोन हो-जुन और इम से-मी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सीरिजच्या १० व्या भागात जी-सब मानव निर्मित विषाणूबद्दल चेतावणी देतो. यानंतर कोणीतरी मृत्यूदर ९० टक्के करण्यासाठी करोना व्हायरस बनवल्यां डॉक्टर सांगतात. यानंतर त्या व्हिडिओमध्ये काही लोकांनी या व्हायरसचा वापर जीवशास्त्रीय (बायोलॉजिकल) हत्यार म्हणून करण्यात आल्याचं म्हटलं. तसंच हा व्हायरस कळून यायला दोन दिवस ते १४ दिवस लागतात असंही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.