| मुंबई | स्थलांतरित मजुरांसाठी चालवण्यात येणाऱ्या श्रमिक रेल्वेच्या तिकीटाचा ८५ टक्के भार केंद्र सरकारकडून उचलण्यात येतो, हा भाजपचा दावा काँग्रेसने साफ फेटाळून लावला आहे. भाजपचे नेते खोटं बोलत आहेत. राज्यातून जाणार्या सर्व प्रवाशांचा खर्च आज राज्य सरकार करत आहे. भाडं कशा पद्धतीने लागू करावं याचं रेल्वेने जारी केलेले पत्र आहे. या पत्रात नेहमीच्या तिकीट दरावर श्रमिक एक्स्प्रेससाठी ५० रुपयांचा अधिभार रेल्वेने लावला आहे. हे पत्र भाजपच्या निष्ठुरतेचे उदाहरण आहे, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली.
स्थलांतरीत मजुरांच्या प्रवासाचा ८५% खर्च केंद्रातील भाजप सरकार उचलत आहे याचा एकतरी पुरावा भाजप प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil यांनी दाखवावा, अन्यथा जनतेची माफी मागावी: मा. @sachin_inc pic.twitter.com/MQq7xrk0cf
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 18, 2020
गेल्या काही दिवसांपासून श्रमिक रेल्वेच्या तिकीटाच्या खर्चावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी दिल्लीत झालेल्या पत्रकारपरिषदेत श्रमिक रेल्वेच्या तिकिटांचा ८५ टक्के भार केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा केला होता.
यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ निर्मला सीतारामन यांचा दावा खोडून काढला होता. निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य ऐकून मला धक्काच बसला. रेल्वेचे तिकीट केंद्रीय रेल्वे प्रशासन देत नाही. त्याचा सर्व भार राज्य सरकार उचलत आहे. यापूर्वी जे मजूर रेल्वेमार्फत गेले त्या सर्व श्रमिकांकडून केंद्रीय रेल्वे प्रशासनाने तिकिटाचे पैसे घेतले. मजुरांजवळ काम नाही. त्यांच्याजवळ पैसे नाहीत. त्यामुळे मजुरांचा प्रवास मोफत करा, अशी मागणी आम्ही त्याचवेळी केली होती. मात्र, तरीही रेल्वे प्रशासनाने आमचे ऐकले नाही. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील ५४.७० कोटी रुपये मजुरांच्या प्रवास खर्चासाठी दिल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा