| मुंबई | सिनेसृष्टीतल्या कलाकारांना सध्या नवं माध्यम खुणावतंय. लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकार या नव्या माध्यमाकडे वळले आहेत. सध्या कोरोनामुळे सगळंच ठप्प झालं आहे. मनोरंजनसृष्टीचा विचार केला तर या क्षेत्राचं स्वरुप पाहता लॉकडाऊननंतर सर्वात शेवटचं प्राधान्य या क्षेत्राला असेल. काळाची हीच पावलं ओळखून काही कलाकारांनी या संकटातही संधी शोधली आहे. युट्यूब या माध्यमातून आपली कला लोकांसमोर आणली आहे.
अभिनेता अमेय वाघनं ‘वाघाचा स्वॅग’ या नावानं स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. काही दिवसातच त्याच्या युटयूब चॅनेलला १४ हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर मिळाले आहेत. तर व्हिडीओला ५० हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळत आहेत.“जेव्हा एक दार बंद होतं तेव्हा दुसरं सुरु होतं. अमेरिकेत जेव्हा आमचे ‘अमर फोटो स्टुडिओ’चे ११ प्रयोग रद्द झाले, तेव्हा प्रचंड निराशा झाली. त्यात लॉकडाऊननं आणखी भर पडली. पण शो मस्ट गो ऑन म्हणत या नव्या माध्यमात प्रयोग करुन पाहिला आणि त्याला सगळ्यांनीच उदंड प्रतिसाद दिला,” असं अमेय वाघ ‘ म्हणाला.
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही काळासोबत स्वत:ला जुळवून घेत यूटयूब चॅनेल सुरु केलं. ‘आशा भोसले ऑफिशियल’ असं त्यांच्या चॅनेलचं नावं आहे. ‘खुळता कळी खुलेना’ या मालिकेतली मानसी अर्थात मयुरी देशमुख, बिग बॉस फेम अभिनेत्री रुपाली भोसले यांनीसुद्धा स्वत:चं चॅनेल सुरु केलं आहे.
नवीन youtube channel आणि त्यावरचा नवीन episode ! बघितला का?
— Amey Wagh (@ameywaghbola) May 7, 2020
Coffee | Vishay Asa Ahe | Amey Wagh | Kshitij Patwardhan | #WaghChaSwag https://t.co/gIXruQn28Q via @YouTube
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा