भाजपचे आंदोलन गळपटले..! उलट #महाराष्ट्रद्रोहीBJP हे ट्विटर वर ट्रेडिंगमध्ये..!

| मुंबई | सरकार निष्क्रिय आहे, सरकार या संकटात महाराष्ट्राला सांभाळण्यात अपयशी ठरत आहे, असे सांगत भाजप महाराष्ट्राने आंगण हेच रणांगण हे आंदोलन आज सुरु केले होते. सर्व भाजप कार्यकर्त्यांना काळे फित, काळे कपडे आणि काळ्या गोष्टी वापरत सरकार विरोधात निषेध करण्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल फेसबुकच्या माध्यमातून दिली होती.

परंतु त्या आंदोलनाकडे कार्यकर्ते आणि भाजप समर्थकांनी पाठ फिरवत घरामध्ये राहूनच एकंदरीत महाराष्ट्रात होणारी आंदोलनाची मजा बघण्यास पसंत केले आहे. काल पाटील यांनी आवाहन करताच नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता संपूर्ण सोशल मीडियावर या आंदोलनाची खिल्ली उडवण्यास नेटकऱ्यांनी सहभाग घेतला. आज तर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर भगवा हातात घेऊन तरुणांनी या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.

भाजपा आमदार, खासदार, नगरसेवक एवढेच नाहीतर सध्या कार्यकर्त्यांना देखील कॉमेंट आणि मेसेजवरून ट्रोल केले जात असल्याचे दिसले. या परिस्थितीमध्ये ट्रोलर्स पासून वाचण्यासाठी अनेक भाजप कार्यकर्त्यांनी घरात राहणे पसंत केले. त्यामुळे हे आंदोलन फेल झाल्याचे दिसून येत आहे.

 विशेष म्हणजे कित्येक खासदार, आमदार, नगरसेवक यांनी ना हे आंदोलन केले , ना फोटो शेअर केले. हे ट्विटर वरून स्पष्ट होत आहे. तसेच ज्यांचा दुरान्वये संबंध नाही अश्या मुलांना उन्हात उभे करून घाणेरडे राजकारण करणाऱ्या भाजप वर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. तसेच #महाराष्ट्रद्रोहीBJP हा ट्रेंड देखील सध्या प्रचंड ट्रेडिंग वर आहे. 

 

एकंदरित, ठाकरे सरकारबरोबर महाराष्ट्रातील अधिकतर जनता असल्याचे आणि दुसरीकडे भाजपचेच नेते, लोकप्रतिनिधी या आंदोलनापासून दूर राहिल्याचे चित्र महाराष्ट्रभर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *