| नवी दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख ३८ हजार ८४५ झाली आहे. यामुळेच जगातील कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी देशातील वैज्ञानिकही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. देशात १४ ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी ४ लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी दिली आहे.
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ‘जगाप्रमाणे भारतातही कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु असून अनेक वैज्ञानिक सक्रियरित्या काम करत आहेत. आपल्या देशात १४ ठिकाणी काम सुरु असून विविध टप्प्यांमध्ये हे संशोधन केलं जात आहे.’ ते म्हणाले की, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैव तंत्रज्ञान विभाग नियामक मंजुरी, अनुदान आणि आर्थिक अशा प्रकारे मदत करत आहे.’ पुढे बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ‘जे कोणी लस शोधण्यासाठी काम करत आहेत. त्यांना आर्थिक मदत आणि नियमांनुसार, परवानगी देण्यात येणार आहे. १४ ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी ४ लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार आहे.’
दरम्यान, भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्या सोशल मीडियावरून साधलेल्या ऑनलाईन संवादात बोलताना आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली.!
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री