| तिरुवअनंतपूरम | केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मागच्या एका आठवड्यात केरळमध्ये ३०० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केरळमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान काल दिल्लीत देखील हजार हुन अधिक रुग्णांची भर पडली होती.
कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या महिन्याच्या मध्यापर्यंत केरळमध्ये परिस्थिती नियंत्रणात होती. पण आता केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असे तज्ञ सांगत आहेत. देशातंर्गत प्रवास आणि परदेशातून येणा-या नागरिकांमुळे केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे.मागच्या एका आठवडयात केरळमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६६६ वरुन १००३ पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा वेग १२ दिवसांपेक्षा कमी आहे. राष्ट्रीय स्तरावर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण १४ दिवस आहे.
मे च्या मध्यापर्यंत केरळमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होण्याचे प्रमाणे १०० पेक्षा जास्त दिवस होते. मागच्या काही दिवसात केरळमध्ये एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. कोरोनाची लागण झालेले ९० टक्केपेक्षा जास्त रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले होते. केरळमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत मृत्यूदरही प्रचंड कमी आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर निर्बंध शिथील झाले. अनेकांना त्यांच्या राज्यात परतण्याची मुभा दिली त्यानंतर केरळमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. ही दुसरी लाट तर नाही ना..? याने केरळ मधील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री