
| ठाणे | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वाढदिवसाच्या खर्चावर होणारा खर्च टाळत माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अकरा लाख रुपयांची मदत करीत सामाजिक दृष्टीकोन जपला आहे. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात पिंपरी, दिवा, एमआयडीसी, कोळे, उंबार्ली, गोळवली, लोकग्राम, कचोरे, भाल आदी ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये सुमारे १००० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा ०२ जून रोजी वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते मात्र यावर्षी वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले व वाढदिवसावर होणारा खर्च टाळत सामाजिक हित जपले आहे.
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांच्या माध्यमातून शीळ, दिवा, मुंब्रा, मानपाडा पोलीस स्टेशन तसेच वाहतूक पोलिसांना मास्कचे वाटप. दिवा विभाग, शीळ डायघर व मानपाडा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे कल्याणफाटा, मानपाडा वाहतूक पोलीस, मुंब्रा, शीळ अग्निशमन केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, शासकीय कर्मचारी आणि निराधार व्यक्तींना दररोज १००० जेवणाचे पॅकेट तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली. गरजू ३००० कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप यामध्ये तांदूळ, डाळ, साखर, तेल, कांदे, बटाटे, मसाला, हळद, मीठ आदी जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर मतदार संघातील सुमारे ५००० रिक्षाचालक व निराधार महिलांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप होत आहे.
त्याचबरोबर सहायक पोलीस आयुक्त कार्यालय कळवा व डोंबिवली आणि टिळकनगर, रामनगर, मानपाडा, डायघर, मुंब्रा, दिवा प्रभाग समिती यांना पीपीई कीटचे व फेस शिल्ड्चे वाटप करण्यात आले आहे. आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी शिफारस केलेल्या कोरोनासाठी रोगप्रतिकारक अर्सेनिक अल्बम – ३० गोळ्यांचे वाटप संपूर्ण कल्याण ग्रामीण मतदार संघात जवळपास १ लाख नागरिकांना मोफत करण्यात आले. यासह सरकारी कार्यालयांकरिता १० हजार सॅनिटायझरच्या बॉटल पुरविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मतदार संघात ३०,००० पेक्षा जास्त मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू प्रतिबंधित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विविध उपाययोजना खंबीरपणे राबवीत असताना मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार सुभाष भोईर यांचे कल्याण ग्रामीण मतदार संघात विविध साहित्याचे मोठ्या प्रमाणावर वाटप सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार सुभाष भोईर यांनी आज अकरा लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे जाहीर केले आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा