| मुंबई | रायगडच्या श्रीवर्धन-दिवेआगार किनाऱ्यावर धडकलेले निसर्ग चक्रीवादळ चार वाजता पुण्याच्या पश्चिमेला मुंबईपासून ७५ किलोमीटर दूर होतं. हळूहळू त्याची तीव्रता कमी होणार असून वाऱ्याचा वेग कमी होत जाईल आणि नाशिक, पुणे, पालघर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.(route of nisarga cyclone)
श्रीवर्धन, दिवेआगार किनाऱ्यावर धडकलेलं निसर्ग चक्रीवादळ भूपृष्ठभागावर पुणे मुंबई मधील पट्ट्यातून पुढे सरकत जात आहे. केंद्रबिंदूपासून चक्रीवादळाचा व्यास ५० किलोमीटर इतका होता. निसर्ग चक्रीवादळाचा पसारा साधारण अडिचशे किलोमीटर इतका होता, अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.(route of nisarga cyclone)
समुद्र किनाऱ्यावर आल्यानंतर ११० किमी वेगाने वारे वाहत होते. नंतर त्याची तीव्रता कमी झाली आणि मुंबई, ठाणे परिसरात ९० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत ६० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू लागतील आणि या भागात पाऊसही होईल, अशी माहिती कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
दरम्यान, चक्रीवादळाची दिशा आता पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक या मार्गाने जाणार असल्याची माहिती डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख हवामान संशोधक, पुणे वेधशाळा यांनी वर्तवली आहे. (route of nisarga cyclone)- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री