| मुंबई | नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या यादीत आयआयटी बॉम्बे पुन्हा एकदा वरचढ राहिले आहे. जगाच्या दोनशे उच्च व तंत्र शिक्षण संस्थांच्या यादीत आयआयटी बॉम्बेला १७२ वे स्थान मिळाले आहे. मागील वषीर्पेक्षा क्रमवारीत यंदा आयआयटी बॉम्बेची घसरण झाली असून ही घसरण २० स्थानांची आहे. मागील वर्षी आयआयटी बॉम्बेला १५२ वे स्थान मिळाले होते. पहिल्या ५०० शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातील केवळ आठ संस्थांना स्थान मिळविता आले आहे.
देशात प्रथम स्थान मिळविलेल्या आयआयटी बॉम्बेला जागतिक क्रमवारीसाठी १०० पैकी ४६ गुण मिळविता आले आहेत. देशात जरी आम्ही प्रथमी स्थान मिळविण्यात यशस्वी झालो असलो तरी जागतिक पातळीवर घसरलेल्या क्रमवारीवर आम्ही जास्त लक्ष देणार असल्याचे आयआयटी बॉम्बेचे संचालक शुभाशीष चौधरी यांनी सांगितले.
क्यूएसकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात संस्थेचा शैक्षणिक दर्जा तपासला जातो आणि गुण दिले जातात. त्यात आयआयटी बॉम्बेला कमी गुण मिळाल्याने यापुढे प्रशासन तो वाढविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
क्यूएस दरवर्षी वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग जाहीर करते. यावर्षी १,०२९ विद्यापीठांची यादी तयार केली गेली. यात अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एमआयटी) सलग ९ व्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर स्टॅनफोर्ड, हार्वर्ड आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ अनुक्रमे दुसºया, तिसºया आणि चौथ्या क्रमांकावर आहे. ही सर्व अमेरिकन विद्यापीठे आहेत. पाचवे स्थान यूकेच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला देण्यात आले आहे.याशिवाय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर १८५ व्या स्थानी तर आयआयटी दिल्ली १९३ व्या स्थानी आहे. जगभरातील पहिल्या हजार उच्च शिक्षण देणाºया संस्था, विद्यापीठात भारतातील २१ शिक्षण संस्थाचा समावेश यंदाच्या वर्षीच्या क्यूएस रँकिंगमध्ये आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोरला भारतातील सर्वात उत्तम रिसर्च विद्यापीठाचा दर्जा या रँकिंगमध्ये मिळाला आहे. २७५ व्या स्थानी आयआयटी मद्रास, ३१४ व्या स्थानी आयआयटी खरगपूर, ३५० व्या स्थानी आयआयटी कानपूर,३८३ व्या स्थानी आयआयटी रुरकी आणि ४७० व्या स्थानी आयआयटी गुवाहाटीने स्थान मिळवले आहे. दिल्ली विद्यापीठाला ५०१ ते ५१० च्या मध्ये स्थान मिळाले आहे . तर हैद्राबाद विद्यापीठ आणि सावित्रीबाई पुणे विद्यापीठाला ६५१ ते ७०० च्या रँकमध्ये स्थान मिळाले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .