| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे आपल्या मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. जोपर्यंत कोरोनावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनासोबत जगण्याची तयारी मनाने करायला हवी. सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसत असल्याचं देखील त्यांनी यावेळी पत्रात म्हटलं आहे.
#COVID19 #महाराष्ट्र #महाराष्ट्रसैनिक #gratitude #मनसे #MNS pic.twitter.com/sTl9vne2dN
— Raj Thackeray (@RajThackeray) June 12, 2020
राज ठाकरे यांनी या पत्रात मनसे कार्यकर्त्यांच कौतुक केलं आहे. मनसे कार्यकर्ते लोकांच्या मदतीला धावून जात असल्याचा आनंद आणि अभिमान वाटत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. तसेच आपल्यासारखे सैनिक आपल्याला लाभले म्हणून आपण भाग्यवान असल्याचं देखील म्हटलं आहे.
१४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही. म्हणून कुणीही शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या… ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा असल्याचं म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्या पत्राने मनसे कार्यकर्त्यांना खूप मोठं बळ मिळालं आहे. राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मनसे कार्यकर्त्यांच कौतुक केल्यामुळे त्यांचा हुरूप वाढला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .