शिक्षणाधिकारी यांचे १५ जूनला शाळेत हजर होण्याचे फर्मान अखेर रद्द..!
आमदार कपिल पाटील यांची मध्यस्ती..!

| मुंबई | उद्यापासून सुरु करण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या शाळांबाबत आता महत्वाचा निर्णय आला असून उद्यापासून शासन जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत शाळांमध्ये शिक्षकांनी जावू नये, त्यांनी वर्क फ्रॉम होम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले असल्याचे मुंबई शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सांगितले आहे.

उद्या शाळा सुरू होणार नाहीत, असं स्पष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार कपिल पाटील यांना आज रात्री उशिरा सांगितले.  उद्या १५ जून शिक्षकांनी शाळेत जाण्याची गरज नाही. वर्क फ्रॉम होम करावे. शाळा कधी सुरू करायच्या त्याचा निर्णय उद्या मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन केला जाईल, असे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी आता रात्री आमदार कपिल पाटील यांना सांगितले. 

शाळा उद्यापासून ( १५ जून) सुरू करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी यांनी दिले होते. त्यामुळे प्रचंड गोंधळाचे व संभ्रमाचे वातावरण होते. सर्वत्र यावरून प्रतिक्रिया देखील उमटत होत्या. अनेक संघटनांनी शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्याशी निवेदने देवून संपर्क साधला होता.

अखेर आज आमदार कपिल पाटील यांच्या मध्यस्तीनंतर शिक्षण आयुक्त रात्री उशिरापर्यंत याबद्दलचे आदेश काढत आहेत. शिक्षण आयुक्त यांनी फोनवरून कपिल पाटील यांना सांगितले की, आम्हालाही आदेश आलेले आहेत.आम्ही लवकरच त्याबाबत कळवत आहोत.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *